फोटो सौैजन्य - Social Media
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने 2025 साली तांत्रिक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एकूण 64 रिक्त पदांसाठी ही भरती केली जात आहे. यामध्ये टेक्निशियन-बी, ड्राफ्ट्समन-बी आणि फार्मासिस्ट-ए अशा पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 2 जून 2025 पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 16 जून 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी VSSC ची अधिकृत वेबसाइट www.vssc.gov.in वर जावे लागेल. या पदांसाठी पात्रता निकषांनुसार उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. फार्मासिस्ट-ए पदासाठी उमेदवाराकडे फार्मसीमध्ये डिप्लोमा (D.Pharm) असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयाची सवलत दिली जाईल.
वेतनश्रेणीबाबत बोलायचे झाल्यास, ISRO च्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात (VSSC) टेक्निशियन-बी आणि ड्राफ्ट्समन-बी या पदांसाठी उमेदवारांना ₹21,700 ते ₹69,100 पर्यंतचे मासिक वेतन दिले जाईल, जे सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल-3 मध्ये मोडते. यामुळे उमेदवारांना केवळ प्रतिष्ठित संस्थेमध्ये नोकरीची संधी मिळतेच, पण चांगली आर्थिक स्थिरताही मिळते. याशिवाय, फार्मासिस्ट-ए या पदासाठी ₹29,200 ते ₹92,300 (लेव्हल-5) इतके वेतन निश्चित करण्यात आले आहे, जे या पदाच्या जबाबदाऱ्या आणि शैक्षणिक पात्रतेनुसार उचित आहे. वरील पदांसोबत इतर भत्ते व सुविधाही लागू असतात.
रिक्त पदांचा तपशील पाहता, विविध ट्रेड्समध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यात फिटर 20 पदे, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 11 पदे, टर्नर 6, मशिनिस्ट 5, इलेक्ट्रिशियन 5, इलेक्ट्रोप्लेटर 3, वेल्डर 2, एमआरएसी (रेफ्रिजरेशन/एअर कंडिशनिंग) 1, मोटर व्हेईकल/डिझेल मेकॅनिक 1, फोटोग्राफर 1, कारपेंटर 1, ड्राफ्ट्समन-बी (मेकॅनिकल) 7 आणि फार्मासिस्ट-ए 1 पद अशा एकूण 64 पदांवर भरती केली जाणार आहे.
ही भरती ISRO सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेत होत असल्यामुळे, केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरही तुमच्या करिअरला चालना देणारी ठरू शकते. ISRO मध्ये काम करण्याची संधी ही अनेक तरुण-तरुणींना वाटणारे स्वप्न असते आणि ही भरती त्यासाठी योग्य संधी ठरू शकते. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 16 जून 2025 ही शेवटची तारीख लक्षात ठेवून, सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. योग्य नियोजन, अचूक माहिती आणि वेळेवर अर्ज केल्यास, सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी निश्चितच साध्य होऊ शकते.