
India creates history in space ISRO's rocket launches Bluebird-2 Satellite VIDEO
ISRO LVM3-M6 Bluebird Block-2 launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आज पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाने जगाचे डोळे दिपवले आहेत. बुधवारी सकाळी ठीक ८:५४ वाजता, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM3-M6 ने धडाक्यात उड्डाण केले. या मोहिमेअंतर्गत अमेरिकन कंपनी ‘एएसटी स्पेसमोबाइल’चा (AST SpaceMobile) पुढच्या पिढीतील ‘ब्लूबर्ड ब्लॉक-२’ (Bluebird Block-2) हा अवाढव्य उपग्रह यशस्वीरीत्या त्याच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे.
‘ब्लूबर्ड ब्लॉक-२’ हा केवळ एक उपग्रह नसून टेलिकॉम क्षेत्रातील एक क्रांती आहे. सध्या आपल्याला इंटरनेटसाठी टॉवर्सवर अवलंबून राहावे लागते, परंतु हा उपग्रह विशेषतः स्मार्टफोनला थेट ४जी आणि ५जी सेल्युलर ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी डिझाइन केला आहे. याचा अर्थ असा की, जिथे मोबाइल टॉवर नाही, अशा दुर्गम भागात, समुद्रात किंवा डोंगराळ भागातही तुमच्या सामान्य स्मार्टफोनवर हाय-स्पीड इंटरनेट चालू शकेल. या उपग्रहाचा आकार आणि त्यातील अद्ययावत अँटेना तंत्रज्ञान यामुळे तो जगातील सर्वात प्रगत व्यावसायिक उपग्रहांपैकी एक मानला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : श्रीमंतीच्या आड लपलेला सैतान! पाहा कसा होता ‘Jeffrey Epstein’ च्या ‘Lolita Express’ आणि ‘पीडोफाईल आयलंड’चा थरार?
तांत्रिकदृष्ट्या ही मोहीम इस्रोसाठी अत्यंत आव्हानात्मक होती. ब्लूबर्ड ब्लॉक-२ उपग्रहाचे वजन तब्बल ६,१०० किलो आहे. इस्रोने आपल्या सर्वात वजनदार ‘बाहुबली’ रॉकेट म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3) द्वारे लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) वाहून नेलेला हा आजवरचा सर्वात वजनदार पेलोड आहे. यापूर्वी, २ नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित केलेल्या ४,४०० किलो वजनाच्या CMS-03 उपग्रहाचा विक्रम आज भारताने मोडीत काढला आहे. ६ टन वजनाचा उपग्रह अचूकतेने अवकाशात स्थिर करणे, हे भारताच्या वाढत्या अंतराळ शक्तीचे निदर्शक आहे.
#WATCH | Sriharikota, Andhra Pradesh | ISRO’s LVM3 M6 mission lifts off from the Satish Dhawan Space Centre, carrying the BlueBird Block-2 satellite into orbit, as part of a commercial deal with U.S.-based AST SpaceMobile. The mission will deploy the next-generation… pic.twitter.com/VceVBLOU5n — ANI (@ANI) December 24, 2025
credit : social media and Twitter
हे प्रक्षेपण इस्रोची व्यावसायिक शाखा, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) आणि अमेरिकन कंपनी एएसटी स्पेसमोबाइल यांच्यातील करारानुसार करण्यात आले. जगातील मोठ्या कंपन्या आता एलन मस्क यांच्या स्पेसएक्सऐवजी भारताच्या इस्रोला पसंती देत आहेत, कारण इस्रोची सेवा विश्वासार्ह आणि किफायतशीर आहे. या यशस्वी प्रक्षेपणामुळे जागतिक सॅटेलाईट लाँचिंग मार्केटमध्ये भारताचा वाटा आणि प्रतिष्ठा दोन्ही अनेक पटींनी वाढली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Turkey Parliament बनली ‘रणांगण’! Erdogan यांच्या खासदाराला विरोधकांनी भर सभागृहात बदडले; अर्थसंकल्पावरून 10 मिनिटे तुंबळ हाणामारी
या प्रक्षेपणाने केवळ भारताची मान उंचावली नाही, तर संपूर्ण जगासाठी कनेक्टिव्हिटीची नवीन दारे उघडली आहेत. येत्या काळात अशा आणखी उपग्रहांचे जाळे विणले जाईल, ज्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती, तो कुठेही असला तरी, अवकाशातून थेट इंटरनेटशी जोडली जाईल. इस्रोचे अध्यक्ष आणि टीमच्या या कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
Ans: हा उपग्रह सामान्य स्मार्टफोनला थेट ४जी/५जी सेल्युलर ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यामुळे टॉवरशिवाय इंटरनेट मिळेल.
Ans: इस्रोने आपल्या LVM3 रॉकेटद्वारे ६,१०० किलो वजनाचा पेलोड लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवून स्वतःचाच सर्वात वजनदार प्रक्षेपणाचा विक्रम मोडला.
Ans: हे प्रक्षेपण बुधवारी सकाळी ८:५४ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पार पडले.