फोटो सौजन्य - Social Media
पोलीस भरतीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांना लवकरच या भरतीचा सुवर्णलाभ घेता येणार आहे. या भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ( ITBP ) ने या भरतीची नीव ठेवली आहे. एएसआय, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलच्या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. महत्वाची बाब अशी आहे कि, या भरतीविषयी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभाग घेऊ पाहणार्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : सुप्रीम कोर्ट भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर; ‘या’ दिवशी होणार उमेदवारांची नियुक्ती
“इंडो तिबेटियन बोर्ड पोलीस (ITBP) मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. २८ ऑक्टोपबरपासून या भरतीला सुरु केले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत संकेस्थळावर करता येणार आहे.इंडो तिबेटियन बोर्ड पोलीस (ITBP) मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. २८ ऑक्टोपबरपासून या भरतीला सुरु केले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत संकेस्थळावर करता येणार आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू इच्छुक आहात, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये भरती विषयी सखोल माहिती देण्यात आली आहे. अर्जाअगोदर या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. ITBP ने आयोजित केलेल्या या भरतीमध्ये विविध पदांचा विचार केला जाणार आहे. यामध्ये भर्ती रेडियोग्राफी, फिजियोथैरेपिस्ट, टेक्नीशियन, चपरासी, ड्रेसरसारख्या पदांचा समावेश आहे, तसेच एएसआय, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलच्या विविध पदांचा विचार या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
उमेदवारांना अर्ज करायचे असल्यास काही अटी शर्तीना पात्र आसने अनिवार्य आहे. या अटी शर्ती शैक्षणिक असून तसेच व्यायोमायदे संबंधित आहेत. एकानदारीत, एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. सरकारी क्षेत्रातील ग्रुप सी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे ते २० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर कमाल वय २५ वर्षे ते २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : कोकण रेल्वेच्या भरतीमध्ये अर्ज करण्याची मुदत वाढवली; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
या भरती प्रक्रियेत नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना लिखित परीक्षा, फिजिकल, डॉक्यूमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल एग्जामिनेशन उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. निवड प्रक्रियेत उत्तीर्ण उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल, नियुक्त उमेदवारावला 21,700-92,300/- दरमहा वेतन पुरवले जाईल. उमेदवाराचे वेतन त्याच्या अनुभवावर मुख्यतः ग्रेड वर अवलंबून असेल.
या भरतीसाठी उत्तीर्ण उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून SSC तसेच HSC उत्तीर्ण हवा. तसेच साबणाधित क्षेत्रामध्ये डिप्लोमा धारक हवा. भरतीमध्ये अर्ज २८ ऑक्टोबरपासून करता येणार असून उमेदवारांना २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करायचे आहे.