Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JNVST Class 6 Admission: नवोदय विद्यालयात प्रवेशाची शेवटची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज!

JNVST Class 6 Admission: जवाहर नवोदय विद्यालय समितीने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता ६ मधील प्रवेश अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून किती केली आहे आणि यासाठी पात्रता व वयोमर्यादा काय आहे? जाणून घ्या सविस्तर!

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 06, 2026 | 12:02 PM
jnv

jnv

Follow Us
Follow Us:

JNVST Class 6 Admission: जवाहर नवोदय विद्यालय समितीने शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता ६ मधील प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जवाहर नवोदय विद्यालयाने परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवून ७ ऑगस्ट केली आहे. जे विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे आतापर्यंत अर्ज करू शकले नव्हते, ते आता वाढवलेल्या मुदतीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. नवोदयमध्ये प्रवेश संपूर्णपणे निवड प्रक्रियेवर आधारित असतो आणि येथे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जाते.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवार navodaya.gov.in किंवा cbseitms.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जादरम्यान विद्यार्थी आणि पालकांशी संबंधित सर्व माहिती अचूक भरावी लागेल. त्यानंतर ठरवलेल्या फॉरमॅटमध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. जवाहर नवोदय विद्यालय समितीने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त एकदाच अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज आढळल्यास पडताळणीदरम्यान ते रद्द केले जातील.

अर्जासाठी पात्रता आणि वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता: इयत्ता ६ मधील प्रवेशासाठी अर्ज करणारा विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळेत इयत्ता ५ मध्ये शिकत किंवा उत्तीर्ण असावा. तसेच त्याने इयत्ता ३, ४ आणि ५ चे शिक्षण देखील मान्यताप्राप्त शाळेतून पूर्ण केलेले असावे.

Indian Army: भारतीय सेना अग्निवीर भरतीत सहभागी होताना कोणती कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे? जाणून घ्या सविस्तर!

जिल्हा निकष: उमेदवार ज्या जिल्ह्यात राहतो, त्याच जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयासाठी अर्ज करू शकतो. मात्र, विद्यार्थ्याची शाळा शेजारच्या जिल्ह्यात असेल आणि ती त्याच्या घरापासून १० किलोमीटरच्या परिघात येत असेल, तर पडताळणीनंतर अर्ज स्वीकारला जाऊ शकतो. चुकीच्या जिल्ह्यासाठी केलेला अर्ज निवड झाल्यानंतरही रद्द केला जाऊ शकतो.

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म १ मे २०१५ ते ३१ जुलै २०१७ दरम्यान झालेला असावा. ठरवलेल्या वयोमर्यादेच्या बाहेरील उमेदवार अर्जासाठी पात्र असणार नाहीत.

UGC Fake Universities: यूजीसीकडून देशातील ‘या’ बनावट विद्यापीठांवर कडक कारवाईचे निर्देश; जाणून घ्या सविस्तर..

परीक्षा कधी होणार आणि पॅटर्न कसा असेल?

इयत्ता ६ मधील प्रवेशासाठी JNVST २०२७ परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल. परीक्षेचा कालावधी २ तास असेल आणि ही परीक्षा सकाळी ११:३० ते दुपारी १:३० या वेळेत घेतली जाईल. प्रश्नपत्रिकेत तीन विभाग असतील, ज्यामध्ये प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा एकूण १०० गुणांची असेल. परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जाईल. निकाल मार्च-आप्रेल २०२७ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Jnvst class 6 admission 2026 last date extended marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Admission News
  • education

संबंधित बातम्या

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
1

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
2

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
3

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
4

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.