
फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीची संधी शोधत असाल, तर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (DMRC) तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन आले आहे. ( Job ) डीएमआरसीत जनरल मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करता येतील.
या भरतीसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी आणि किमान 60% गुण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना रेल्वे, केंद्र/राज्य शासन विभाग किंवा सार्वजनिक उपक्रमात कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. संगणक अनुप्रयोगांची मूलभूत माहिती असणेही आवश्यक आहे. वयमर्यादा 1 ऑक्टोबर 2025 रोजी 55 ते 57 वर्षांपर्यंत (पदानुसार) ठेवण्यात आली आहे.
लिखित परीक्षा नाही – थेट मुलाखत!
या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांची निवड अनुभव आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल. सर्व अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांची यादी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाईल, तर चौथ्या आठवड्यात मुलाखती घेण्यात येतील.
वेतन आणि सुविधा:
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार ₹1,20,000 ते ₹2,80,000 प्रति महिना इतके वेतन मिळेल. याशिवाय डीएमआरसीच्या नियमानुसार इतर भत्ते आणि सुविधाही दिल्या जातील.
अर्ज कसा करावा:
महत्वाचे:
अर्ज योग्य प्रकारे आणि वेळेत पोहोचणे अत्यावश्यक आहे. उशिरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
ही नोकरी २.८ लाख रुपयांपर्यंत मासिक वेतनासह स्थिर आणि प्रतिष्ठित करिअरची संधी ठरू शकते!