फोटो सौजन्य - Social Media
या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. परीक्षेची तारीख बँकेकडून लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीच्या तारखा देखील त्याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
एकूण ४३४ जागांपैकी ७०% पदे पुणे जिल्ह्याच्या कायम रहिवासी उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत, तर ३०% पदांसाठी राज्यातील इतर जिल्ह्यांतील उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे. जर बाहेरील जिल्ह्यांमधून पुरेसे पात्र उमेदवार मिळाले नाहीत, तर ती पदे पुण्यातील पात्र उमेदवारांकडून भरली जातील. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना या भरतीचे लाभ घेण्याचे आवाहान वेळोवेळी PDCC Bank कडून करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे अर्ज करताना उमेदवारांनी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र न दिल्यास अर्ज अपूर्ण मानला जाईल. तसेच अर्ज करताना ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक अचूक नमूद करणे बंधनकारक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज थेट अमान्य ठरेल.
अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया देखील ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे करण्यात येईल. भरतीशी संबंधित सर्व माहिती, अद्यतने आणि सूचना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (PDCC Bank Official Website) प्रकाशित केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळ नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.
संधी तुमच्या दारात आली आहे. अर्ज करा आणि करिअरची नवी दिशा ठरवा!






