Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: जिल्हा परिषदेच्या निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम! मतदान जनजागृती

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 08, 2026 | 10:30 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असून, या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध पातळ्यांवर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत प्रभावी मतदान जनजागृती अभियान राबवले आहे.

मुलांनो, चला तयारी सुरू करा! ‘ही’ Bank 5 हजार पदांची भरती करणार; प्रोसेस एकदम सोपी, वाचाच…

रायगड जिल्हा परिषदेच्या सहा आणि कर्जत पंचायत समितीच्या बारा गणांमध्ये ही निवडणूक होत आहे. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याने, शालेय संस्थांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्या विकास शाळेने यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांना थेट जनजागृतीच्या कामात सहभागी करून घेतले. नेरळ गावात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर रांगोळ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. ‘मतदान हा तुमचा हक्क आहे’, ‘एक मत – मजबूत लोकशाही’ अशा आशयाच्या संदेशांनी सजवलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. चौकाचौकात काढण्यात आलेल्या या रांगोळ्यांमुळे मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

यासोबतच शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांना जागरूक केले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या पथनाट्यातून मतदान न केल्यास होणारे परिणाम, लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व आणि प्रत्येक मताचे मूल्य प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी नेरळ गावातील विविध चौकांमध्ये फिरत हे पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या सशक्त अभिनयाने आणि सोप्या भाषेतील संदेशामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढताना दिसून आली. अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. शाळेच्या या उपक्रमामुळे नेरळ गावात मतदानाचा टक्का वाढण्यास निश्चितच मदत होत असल्याचे चित्र दिसत आहे.

CTET Question Paper 2026 : सीटीईटी पेपर-२ वरून गोंधळ, दोन केंद्रांवर परीक्षा रद्द, १५ दिवसांत पुन्हा परीक्षा

लोकशाहीचे मूल्य लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. केवळ अभ्यासक्रमापुरते शिक्षण न देता सामाजिक जाणीव निर्माण करणे ही शिक्षणाची खरी भूमिका असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. विद्या विकास शाळेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना वाढली असून, गावपातळीवर लोकशाही प्रक्रियेला बळ मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे.

Web Title: In the backdrop of the zilla parishad elections students undertake a unique initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Career
  • Mumbai News

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
1

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
2

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
3

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
4

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.