Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Junior College Teachers: शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला! शिक्षण विभागाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात महाविद्यालयीन शिक्षकांचा संताप

Junior College Teachers Protest: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने २७ मे रोजी जाहीर केलेला संच मान्यतेचा नवीन कच्चा आराखडा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप होत आहे. शिक्षकांनी उपसंचालक कैलास दातखीळ यांच्याकडे कोणती मागणी केली? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 03, 2026 | 11:01 AM
शिक्षक

शिक्षक

Follow Us
Follow Us:

Junior College Teachers: महाराष्ट्र शासनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची पदे मंजूर करण्याची (संच मान्यता) प्रक्रियेच्या निकषात बदल करण्याचा मसुदा अन्यायकारक असल्याचा आरोप कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी केला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक संधी हिरावून घेतल्या जाण्याची शक्यता असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. म्हणून संचमान्यता पूर्वीच्या पद्धतीनुसार व्हावी, अशी शिक्षकांची मागणी आहे.

शिक्षकांच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न

शिक्षण विभागाने संच मान्यतेसंबंधित २७ मे रोजी हा कच्चा आराखडा जाहीर केला. त्यावरून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांची भेट घेत शिक्षकांनी याबाबत संताप व्यक्त केला. तसेच उपसंचालक कैलास दातखीळ यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले.

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जून महिन्यात ‘या’ ४ मोठ्या विभागात बंपर भरती! जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर…

या कच्चा आराखड्याबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न असून यामुळे सुमारे आठ हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची संख्या कमी होईल,ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असे म्हणणे या शिक्षकांचे आहे. तसेच त्यांनी शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन नवीन मसुदा तयार करावा, असे अश्वासन देऊनही ते पाळले नसल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे.

प्रचलित निकषाप्रमाणेच संच मान्यता

शिक्षण संचालक कार्यालयाने प्रचलित निकष बाजूला करून ऑनलाइन पद्धतीने संच मान्यता ड्रफ्ट दिला. त्यानुसार 45 मिनिटांची तासिका 40 मिनिटांची करण्यात आली. यासोबतच इतरही निकषही बदलण्यात आले. परिणामी राज्यात आठ ते दहा हजार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक अतिरिक्त दिसण्याची शक्यता आहे. म्हणून संच मान्यतेचे निकष बदलण्यात येऊ नयेत व प्रचलित निकषाप्रमाणेच संच मान्यता करण्यात याव्यात, अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील, प्रा. चंपालाल कहाटे, प्रा. गोविंद शिंदे, प्रा. अरुण काटे, प्रा. प्रदिप पाटील, प्रा. अब्बस शेख आदी शिक्षकानी केले.

Bank Bharti: बँकिंग क्षेत्रात १२ हजारांहून अधिक जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी, ८ जूनपूर्वी करा अर्ज!

Web Title: Junior college teachers protest against new sanch manyata draft maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • Teacher Jobs
  • Teacher Recruitment
  • Teacher School

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.