फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Top 4 Government Jobs in June 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. यंदाच्या जून महिन्यात भारतीय रेल्वे, एसएससी, यूपीएससी आणि बँकिंग क्षेत्रात बंपर भरतीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेद्वारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आवेदन करावे कारण यानंतर अशा जाहिरातीसांठी खूप वेळ वाट पहावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच ४ भरतीबद्दल सांगणार आहोत. ज्याची माहिती जाणून घेऊन तुम्ही अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता…
एसएससी अंतर्गत CGL परीक्षेची १२,२५६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेद्वार ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी उमेद्वारांनी २२ जून २०२६ पूर्वी अर्ज करावा. तसेच त्यांनी २३ जून २०२६ पर्यंत अर्ज शुल्क जमा करावे.
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ११,१२७ असिस्टंट लोकोपायलट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. योग्य आणि इच्छुक उमेद्वार rrbapply.gov.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन १४ जून २०२६ पूर्वी अर्ज करू शकतात. या पदासाठी १०वी + ITI, डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची डिग्री अनिवार्य आहे.
संघ लोकसेवा आयोग (UPSC)ने CDS परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. आयएमए (IMA), ओटीए (OTA), नौसेना (Navy) आणि वायुसेना (Air Force) अधिकारी अशा ४५१ पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली असून उमेद्वार यूपीएससीच्या अधिकृत upsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन ९ जून २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.
यूपीएससीने एनडीए आणि नौसेना अकॅडमीच्या एकूण ३९४ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ९ जून २०२६ पर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या भरतीअंतर्गत सेना, नौसेना आणि वायुसेनाची भरती करण्यात येणार आहे.






