फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Mega Bank Bharti: सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी खूशखबर आहे. देशातील प्रमुख सरकारी बँकांनी अप्रेंटिसशिप (प्रशिक्षणार्थी) कार्यक्रमांतर्गत १२,००० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही संधी विशेषतः पदवी (Graduation) शिक्षण पूर्ण केलेल्या आणि बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव घेऊ इच्छित असणाऱ्या उमे्द्वारांसाठी आहे.
बँकांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक उमेदवार या पदासाठी ८ जूनपर्यंत बंँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना बँकिंग कार्यप्रणाली, ग्राहक सेवा, डिजिटल बँकिंग आणि इतर वित्तीय सेवांशी संबंधित काम शिकण्याची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय, वयोमर्यादा आणि इतर पात्रतेच्या अटी संबंधित बँकेच्या अधिसूचनेनुसार ठरवल्या गेल्या आहेत. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये ही अप्रेंटिस भरती निघाली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): एकूण ७,१५० अप्रेंटिस जागा रिक्त आहेत.
बँक ऑफ बडोदा (BOB): एकूण ५,००० अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार या दोन्ही भरतींसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी इच्छुक उमेद्वार ८ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, स्थानिक भाषेचे ज्ञान आणि कागदपत्र पडताळणी (Document Verification) यांच्या आधारे केली जाईल. काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय चाचणी (Medical Fitness) प्रक्रिया देखील असू शकते. निवडलेल्या उमेदवारांना निश्चित कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल, ज्या दरम्यान त्यांना दरमहा स्टायपेंड (मानधन) देखील दिले जाणार आहे.
हा अप्रेंटिसशिप यापदाचे काम हे तरुणांना बँकिंग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी देतो. यामुळे केवळ कामाचा अनुभवच मिळत नाही, तर भविष्यात बँक क्लर्क, प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही मोठी मदत होते. या भरतीमुळे फ्रेशर उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील बारकावे शिकता येतात.






