Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : मूर्ती लहान पण किर्ती महान; जिल्हापरिषदेतील शाळकरी विद्यार्थ्याला 22 भाषा अवगत

जिल्हा परिषदेच्या वडगावमधील शाळेचे शिक्षक उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात.शाळेच्या आवारात असलेल्या भिंती वारली पेंटिंग करून सजवणे,माझा कोपरा माझी कला असे अनेकविध उपक्रम या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 18, 2025 | 03:55 PM
Raigad News : मूर्ती लहान पण किर्ती महान; जिल्हापरिषदेतील शाळकरी विद्यार्थ्याला 22 भाषा अवगत
Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हापरिषदेतील शाळकरी विद्यार्थ्याला 22 भाषा अवगत
  • मूर्ती लहान पण किर्ती महान
  • विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय कौशल्य

कर्जत/संतोष पेरणे  : जिल्हा परिषदेच्या वडगावमधील शाळेचे शिक्षक उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात.शाळेच्या आवारात असलेल्या भिंती वारली पेंटिंग करून सजवणे,माझा कोपरा माझी कला असे अनेकविध उपक्रम या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले आहेत. त्यात अगदी वेगळे कार्य या शाळेतील विद्यार्थ्यामध्ये एक आगळा वेगळा गुण दिसून आला आहे. सहावीतल्या या शाळकरी मुलाला संविधानातील मान्यता प्राप्त सर्व 22 भाषा अवगत आहेत.

एकीकडे मराठी शाळा ओस पडत असून शाळेत ना शिक्षक राहिलेत ना विद्यार्थी. मराठी शाळांना वाली कोण ? भविष्यात शाळा वाचतील का असा प्रश्न निर्माण होत असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच कौतुक होताना दिसत आहे. देशाच्या संविधानात 22 भाषांना मान्यता आहे. इयत्ता सहावीत शिकत असलेला विद्यार्थी हर्ष एकनाथ गडगे याला दोन नाही तीन नाही तर चक्क 22 भाषा अवगत आहेत.   भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या 22 प्रमुख भाषा फकल लेखन करून वेगळ्या पद्धतीने शालेय सजावट केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात.त्यांच्या संकल्पनेला मूर्तरूप या मुलांनी देऊन शाळेच्या वाटचालीस गावकऱ्यांचे आणि पालकांचे सहकार्य लाभत आहे.

रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक ग्रामीण उत्कृष्ट शाळा वडगाव ही जिल्ह्यातील आघाडीची ग्रामीण भागातील शाळा समजली जाते. या शाळेतील सहावीत शिकत असल्याल्या कु.कस्तुरी जयवंत जाधव वपाणी  आकांक्षा वाघे या मुलींनी शाळेच्या समोरील बाहेरच्या भिंतींवर प्रसिद्ध वारली चित्रकला सुंदर रित्या साकारून भिंती बोलक्या केल्या आहेत. त्यांना शिकवणारे उपक्रमशील शिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे असे वर्गशिक्षक सुभाष राठोड यांच्या सानिध्यात हे सर्व विद्यार्थी घडत आहेत. सुभाष राठोड यांच्या माध्यमातून शाळेतील मुलांना माझा कोपरा,माझी कला हा उपक्रम दिला होता. त्यातून कस्तुरी व आकांक्षा दोघींच्या विचारांनी ही वारली आदिवासी कलेची भिंत साकारण्याचे ठरवले.

Karjat News : अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचं ? आता कागद नको कारवाई हवी,अतिक्रमणावर गावकऱ्यांची नाराजी

शाळेच्या कार्यालयासमोर अशीच खराब असलेली भिंत खरडून ,साफ करून लाल मातीने शेण मिश्रित मातीने सारवून ती स्वच्छ सुंदर केली. हळूहळू आपल्या कुंचल्यातून वारली चित्रकला चितारत गेली.मुळातच कस्तुरी व आकांक्षा यांना चित्रकलेची प्रचंड आवड आहे. या दोन्ही चिमुकल्या मुलींनी आकर्षक आशी वारली चित्रकलेतून आदिम, आदिवासींची जीवनशैली साकारली आहे. या चित्रांमध्ये जल,जंगल, जमीन असे नाव दिले.घर,पाळीव प्राणी,पक्षी,झाडे असे विविध आशय दिसून येतात.चित्रांतूनआदिवासी निसर्गपूजक असल्याचेही दिसते.एवढ्या लहान वयात तिंच्यातली कल्पकता वाखाणण्यासारखी आहे.

हल्ली शैक्षणिक स्पर्धा वाढत आहेत. त्यामुळे ग्रमीण भागातील पालक देखील मुलांना चांगल शिक्षण मिळावं यासाठी शहरात इंग्रजीमाध्यांना प्राधान्य़ देतात. त्यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र असं सगळं असताना जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे कलाकौशल्य हेच अधोरेखित करतात की, मराठी माध्यमातील मुलं आणि विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं देखील चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात.

Karjat News : पटसंख्येअभावी शाळा होणार बंद; जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: 22 भाषा अवगत असलेला विद्यार्थी कोण आहे?

    Ans: रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे सहावीत शिकणारा कु. हर्ष एकनाथ गडगे हा विद्यार्थी भाररायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे सहावीत शिकणारा कु. हर्ष एकनाथ गडगे हा विद्यार्थी भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या सर्व 22 भाषा अवगत करून घेतल्या आहेत.तीय संविधानाने मान्यता दिलेल्या सर्व 22 भाषा अवगत करून घेतल्या आहेत.

  • Que: शाळेतील उपक्रमांचे नेतृत्व कोण करत आहेत?

    Ans: शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक सुभाष राठोड हे नाविन्यपूर्ण शैक्षणिक व कलात्मक उपक्रम राबवत आहेत.

  • Que: वारली चित्रकला कोणी साकारली आहे?

    Ans: सहावीत शिकणाऱ्या कु. कस्तुरी जयवंत जाधव व कु. आकांक्षा वाघे या विद्यार्थिनींनी शाळेच्या बाहेरील भिंतींवर सुंदर वारली चित्रकला साकारली आहे.

Web Title: Karjat news school student harsh gadage from zilla parishad knows 22 languages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • karjat news
  • ZP School

संबंधित बातम्या

Karjat News : अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचं ? आता कागद नको कारवाई हवी,अतिक्रमणावर गावकऱ्यांची नाराजी
1

Karjat News : अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचं ? आता कागद नको कारवाई हवी,अतिक्रमणावर गावकऱ्यांची नाराजी

Karjat News : पटसंख्येअभावी शाळा होणार बंद; जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था
2

Karjat News : पटसंख्येअभावी शाळा होणार बंद; जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?
3

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?

Karjat News : थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहिम; नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीला मंजुरी
4

Karjat News : थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहिम; नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.