Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Police Constable: नीट परीक्षेनंतर पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांनी केला गदारोळ; जाणून घ्या यामागील नेमके कारण…

Civil Police Constable: कर्नाटक पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका आणि OMR शीटवरील नंबर वेगवेगळे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अचानक गोंधळ घातला आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने यावर काय स्पष्टीकरण दिले? जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 04, 2026 | 03:04 PM
police controversy

police controversy

Follow Us
Follow Us:

Civil Police Constable: गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि त्यांच्या आंदोलनांची चर्चा सुरूच आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपर लीकविरोधात झालेली विद्यार्थ्यांची आंदोलने अद्यापही चर्चेत आहेत. पेपर लीक आणि निकाल जाहीर झाल्यानंतर नीटच्या ओएमआर (OMR) शीटवरूनही वाद सुरू आहे. दरम्यान, OMR शीटशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले असून, ते वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे नसून पोलिस भरती परीक्षेचे आहे.

कर्नाटक सिव्हिल पोलिस कॉन्स्टेबलच्या ३,९९१ पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक परीक्षा प्राधिकरतर्फे ही परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभरातील ८०० हून अधिक केंद्रांवर घेण्यात आली. कर्नाटकच्या विजयपुरा येथील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेनंतर ओएमआर शीट दिल्यावर मोठा गोंधळ उडाला.

विजयपुरा येथील टिकोटा शारदाम्बा पीयू कॉलेज परीक्षा केंद्रावर पोलिस कॉन्स्टेबलची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेदरम्यानच हंगामा केला. OMR शीटचा नंबर प्रश्नपत्रिकेच्या नंबरशी जुळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्यातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ध्यावरच सोडली. यानंतर ते परीक्षा केंद्राबाहेर आले आणि त्यांनी रोष व्यक्त केला.

World Youngest Professor: १८ वर्षाचा मुलगा कसा बनला कॉलेजमध्ये प्रोफेसर? जाणून घ्या जगातल्या सर्वात तरुण प्राध्यापकाची यशोगाथा..

विद्यार्थ्यांच्या या गर्दीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांसाठीही कठीण होऊ लागले. या सर्व वादानंतर कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकांकडूनही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.

दोन्ही नंबर सारखे असणे आवश्यक नाही: केईएचे स्पष्टीकरण

या प्रकारानंतर कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकांनी स्पष्ट केले की, ‘कोणत्याही अधिकृत सूचना, निर्देश पुस्तिका किंवा तोंडी सूचनांमध्ये असे कुठेही सांगण्यात आले नव्हते की OMR नंबर आणि प्रश्नपत्रिकेचा नंबर एकच असला पाहिजे.’

त्यांनी पुढे सांगितले की, ‘OMR उत्तर पत्रिकेत प्रश्नपत्रिकेचा सिरीज कोड आणि व्हर्जन कोड भरण्याची तरतूद असते.’

School Education: शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी आणि ड्रॉपआउट रोखण्यासाठी केंद्र सरकारचे नेमके धोरण काय? जाणून घ्या सविस्तर!

विद्यार्थ्यांमधील संभ्रम ठरला गदारोळाचे कारण

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, OMR नंबर आणि प्रश्नपत्रिकेचा नंबर वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी अचानक परीक्षा सोडणे आणि गदारोळ करणे केवळ परीक्षांमध्ये काही गडबड झाली असल्याच्या गैरसमजुतीमुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ही परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली होती.

Web Title: Karnataka police constable recruitment exam omr controversy vijayapura marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Action on Police
  • controversy

संबंधित बातम्या

Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू
1

Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी  अन्…
2

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.