
Sourav Joshi Troll: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सौरव जोशी पुन्हा वादात, गोव्याच्या व्लॉगमुळे ट्रोल, बायकोचा व्हिडिओ घेतल्यावरून लोक भडकले युट्यूबर सौरव जोशी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. त्याच्या एका व्लॉगमुळे तो परत चर्चेत आलाय. Sourav Joshi Troll:
अलीकडेच तो त्याची बायको अवंतिका भट्टसोबत गोव्यात सुट्टीसाठी गेला होता. तिथला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. त्यावरून त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातंय. व्हिडिओत सौरवच्या बायकोबद्दलचं एक दृश्य बघून लोक भडकलेत. Sourav Joshi Troll:
सौरवच्या नवीन व्लॉगमध्ये तो बायको अवंतिकासोबत हॉटेलच्या रूमची टूर देत होता. तो रूममधून बाहेर येऊन प्रायव्हेट पूल दाखवायला जात होता. तेव्हा कॅमेराची लाईट अवंतिकाच्या ड्रेसवर पडली. तिचा ड्रेस थोडा ट्रान्सपरंट होता. त्यामुळे नेटकऱ्यांना ते दृश्य आक्षेपार्ह वाटलं.
Sunita Ahuja Get Emotional: ‘घरातलं चैतन्य हरवलंय…’ दिवाळीच्या आधीच सुनीता आहुजा भावुक
सौरवने चुकून बायकोचा चुकीच्या अँगलने व्हिडिओ घेतला. तो व्हिडिओ तसाच व्लॉगमध्ये अपलोड पण झाला. त्याच्या या निष्काळजीपणावरून लोकांनी त्याला खूप ट्रोल केलंय.
Does Sourav Joshi posts Video like these intentionally or he doesn’t even rechecks before posting. What was that camera angle bruh??? https://t.co/9NCBXkYjor — Gagan Choudhary (@trigguuuu) November 4, 2026
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर लोकांनी त्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. अनेकांचं म्हणणं आहे की, व्हिडिओ शूट केला, मग एडिट पण केला, मग अपलोड केला. मग या सगळ्यात ते दृश्य कसं लक्षात आलं नाही? हे खरंच चक्रावून टाकणारं आहे.
एका युजरने व्हिडिओ शेअर करताना म्हटलंय, शूट केला, एडिट केला आणि तरीही पब्लिक केला, हे कसं काय शक्य आहे?
तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, सौरवने जाणूनबुजून असा कंटेंट टाकलाय का? किंवा अपलोड करायच्या आधी परत चेक केलाच नाही? कॅमेराचा तो अँगल काय होता?
आणखी एका युजरने म्हटलंय, सौरवला व्हिडिओ अपलोड करायच्या आधी एकदा बघायला हवं होतं. काहींना तर हा व्हिडिओ खूपच चुकीचा वाटलाय.
सौरव त्याच्या व्हिडिओमुळे ट्रोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी पण त्याला अनेक वेळा टीकेला सामोरं जावं लागलंय.काही दिवसांपूर्वी त्याने एक व्लॉग टाकला होता. त्यात त्याने ‘ट्रुथ ऑर डेअर’ या खेळादरम्यान त्याची बायको अवंतिकाला त्यांचा पाळीव कुत्रा ओरिओच्या भांड्यातून पाणी प्यायचं डेअर दिलं होतं. सुरुवातीला अवंतिका थोडी कचरत होती, पण नंतर तिने ते डेअर पूर्ण केलं.हा व्हिडिओ समोर आल्यावर अनेकांनी सौरववर टीका केली. त्याने आपल्या बायकोला असं करायला का भाग पाडलं, असा सवाल लोकांनी केला होता.
सौरव जोशी हा भारतातला सगळ्यात मोठा व्लॉगर आहे. त्याचे लाखो-करोडो फॉलोअर्स आहेत. लहान मुलं पण त्याचे व्हिडिओ बघतात. त्यामुळे त्याच्याकडून अशी चूक होणं लोकांना पटलेलं नाही.लोकांचं म्हणणं आहे, व्ह्यूजसाठी आणि कंटेंटसाठी बायकोला असं दाखवणं योग्य नाही. एकदा व्हिडिओ अपलोड झाला की तो डिलीट केला तरी लोकांकडे पोहोचतोच.
सध्या तरी सौरवने या प्रकरणावर काहीच बोललेलं नाही. त्याने तो व्हिडिओ एडिट केला की डिलीट केला, हे पण कळलेलं नाही. पण सोशल मीडियावर मात्र यावरून वाद सुरूच आहे.तुम्हाला काय वाटतं? सौरवकडून खरंच चूक झालीय का, की लोक उगाचच विषय वाढवतायत?
Ans: गोव्यातील सुट्टीदरम्यानचा त्याचा एक व्लॉग व्हायरल झाल्याने सौरव जोशी चर्चेत आला आहे.
Ans: हॉटेल रूम टूरदरम्यान कॅमेऱ्याच्या लाईटमुळे पत्नी अवंतिकाच्या ड्रेसमधून दिसणाऱ्या दृश्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला.
Ans: ट्रुथ ऑर डेअर' खेळादरम्यान त्याने पत्नी अवंतिकाला पाळीव कुत्रा ओरिओच्या भांड्यातून पाणी पिण्याचे डेअर दिले होते. यावरून त्याच्यावर टीका झाली होती.