Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KGMU नर्सिंग ऑफिसर भरती 2025; 733 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊने 733 नर्सिंग ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार 25 एप्रिल 2025 पासून अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 24, 2025 | 07:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) ने 2025 साठी नर्सिंग ऑफिसर म्हणजेच सिस्टर ग्रेड-II पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती नर्सिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. अर्ज प्रक्रिया 25 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.kgmu.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

IPS Success Story: १६ सरकारी नोकऱ्यांना दिला नकार मग “तृप्तीने पहिल्याच डावात मारला षटकार”

या भरतीद्वारे एकूण 733 पदे भरली जाणार असून त्यामध्ये 107 पदे बॅकलॉग अंतर्गत आणि 626 पदे सामान्य भरती अंतर्गत आहेत. या पदांसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित लेखी परीक्षेद्वारे (CRT) केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ₹44,900 ते ₹1,42,400 पर्यंतचा मासिक पगार मिळणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून B.Sc नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक B.Sc नर्सिंग पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात, मात्र त्यांच्याकडे किमान 50 खाटांचे रुग्णालयात दोन वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांतील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम KGMU च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Nursing Officer Recruitment 2025’ या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणी करून लॉगिन माहिती प्राप्त करावी. फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रं अपलोड करावीत. नंतर संबंधित श्रेणीनुसार शुल्क भरावे. सर्वसाधारण, ओबीसी व ईडब्ल्यूएससाठी ₹2,360 तर अनुसूचित जाती-जमातीसाठी ₹1,416 शुल्क आहे. त्यानंतर अर्ज सादर करून त्याची छायांकित प्रत सुरक्षित ठेवावी.

NMDC भरती 2025 : 683 हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी संधी; त्वरित करा अर्ज 

चयन प्रक्रियेअंतर्गत 100 बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी 2 तासांचा कालावधी दिला जाईल. यानंतर पात्र उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी केली जाईल. ही भरती नर्सिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह लवकर अर्ज करून ही संधी साधावी.

Web Title: Kgmu nursing officer bharti 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 07:27 PM

Topics:  

  • Government Job

संबंधित बातम्या

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DSSSB मध्ये 615 पदांसाठी भरती,अर्ज करण्याची शेवटची तारीख आज
1

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DSSSB मध्ये 615 पदांसाठी भरती,अर्ज करण्याची शेवटची तारीख आज

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले
2

MAHA TET 2025: 18-19 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली; RPSC ने नवीन वेळापत्रक जाहीर केले

नोकरीसाठी चक्क मंत्रालयात घेतल्या बोगस मुलाखती, जे. जे. रुग्णालयात मेडिकल; नागपूरच्या भामट्याचा धक्कादायक प्रकार
3

नोकरीसाठी चक्क मंत्रालयात घेतल्या बोगस मुलाखती, जे. जे. रुग्णालयात मेडिकल; नागपूरच्या भामट्याचा धक्कादायक प्रकार

Career News: देशभरातील विविध विभागांमध्ये २५ हजार नव्या नोकऱ्या; कोणत्या क्षेत्रात किती जागा?
4

Career News: देशभरातील विविध विभागांमध्ये २५ हजार नव्या नोकऱ्या; कोणत्या क्षेत्रात किती जागा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.