
कोटक एज्युकेशन फाउंडेशनची 'फ्युचर का गोल्डन टिकीट' कोटक ज्युनियर स्कॉलरशिप योजना जाहीर
कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) – कोटक महिंद्रा ग्रुपचा CSR कार्यान्वयन संस्था – घेऊन आली आहे कोटक ज्युनियर स्कॉलरशिप, ज्याला KEF प्रेमाने म्हणते “Future Ka Ticket.” ही योजना मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील १००० बुद्धिमान विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी रचली गेली आहे. ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक मदत देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी सर्वंकष पाठबळ देते,तरुण प्रतिभेला उंच भरारी घेण्यासाठी.
या शिष्यवृत्तीद्वारे विद्यार्थ्यांना २१ महिन्यांच्या कालावधीत एकूण ₹७३,५०० आर्थिक मदत दिली जाते, जी इयत्ता ११ आणि १२ साठी आहे. केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता, या कार्यक्रमात वैयक्तिक मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी, होम व्हिजिट्स आणि इतर सर्वांगीण विकासासाठी मदत दिली जाते. या उपक्रमातून केवळ शिक्षणच नव्हे, तर उद्याचे व्यावसायिक, उद्योजक आणि समाजनेते घडवले जात आहेत.
गेल्या १८+ वर्षांमध्ये KEF च्या शिष्यवृत्ती उपक्रमाने ६,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला आहे, ज्यापैकी १,८०० पेक्षा जास्त विद्यार्थी आता यशस्वी माजी विद्यार्थी म्हणून उभे आहेत.
“KEF मध्ये आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला मोठं स्वप्न पाहण्याच आणि ते पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी. ‘Future Ka Ticket’ ही केवळ शिष्यवृत्ती नाही, तर तरुण परिवर्तनकर्त्यांच्या प्रवासात त्यांच्या सोबत चालण्याची आमची बांधिलकी आहे,” असे कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यकारिणी सदस्या आणि शिष्यवृत्ती प्रमुख सौ. आरती कौलगुड यांनी सांगितले.
इयत्ता ११ आणि १२ साठी दरमहा ₹३,५०० (२१ महिन्यांमध्ये एकूण ₹७३,५००)
एक-ते-एक वैयक्तिक मार्गदर्शन व शैक्षणिक सहाय्य
करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक क्षेत्रातले अनुभवभेटी
स्पर्धा परीक्षांसाठी तयारी
नियमित होम व्हिजिट्स
SSC/CBSE/ICSE इयत्ता १० बोर्ड परीक्षेत ८५% पेक्षा जास्त गुण
मुंबईतील महाविद्यालयात इयत्ता ११ मध्ये प्रवेश घेतलेला असावा
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹३,२०,००० पेक्षा कमी
मुंबई महानगर प्रदेश (MMR) मधील रहिवासी असावा
कोटक कर्मा ही कोटक महिंद्रा ग्रुपची CSR ओळख आहे, जी शाश्वत आणि समावेशी समाजविकासाच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.