Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kotak Kanya Scholarship: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनकडून ‘या’ विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती जाहीर; जाणून घ्या पात्रता!

Kotak Kanya Scholarship 2026: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनच्या 'कोटक कन्या स्कॉलरशीप २०२६' अंतर्गत विद्यार्थिनींना कशी आर्थिक मदत मिळते आणि या शिष्यवृत्तीसाठी काय आहेत पात्रता निकष? जाणून घ्या सविस्तर....

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 06, 2026 | 03:30 PM
kotak scholarship

kotak scholarship

Follow Us
Follow Us:

Kotak Kanya Scholarship 2026: कोटक महिंद्रा समुहाची सीएसआर अंमलबजावणी शाखा असलेल्या कोटक एज्युकेशन फाऊंडेशनने (केईएफ) आज ‘वन इन अ मिलियन’ या मोहिमेच्या बॅनरखाली ‘कोटक कन्या स्कॉलरशीप 2026’ सुरू करण्याची घोषणा केली. आता सहाव्या वर्षात, हा कार्यक्रम समाजातील वंचित घटकांमधील गुणवान विद्यार्थिनींसाठी व्यावसायिक उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडत आहे. ज्यामुळे त्या करियरच्या मार्गातील आर्थिक अडथळ्यांशिवाय स्वत:च्या महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा करण्यास सक्षम होतील.

2021 मध्ये स्थापना झाल्यापासून, कोटक कन्या स्कॉलरशीप’चा 24 राज्यांमधील 1,525 मुलींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम झाला आहे. 2026-27 मध्ये 500 नवीन विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात येईल. आर्थिक मदतीव्यतिरिक्त, कोटक एज्युकेशन फाऊंडेशन तज्ज्ञ मार्गदर्शन, मौल्यवान करियर मार्गदर्शन, उद्योग परिचय आणि शालेय सत्रे पूर्ण करणे, गंभीर विचारांचे पोषण, 21 व्या शतकातील क्षमता आणि व्यावसायिक क्षेत्रातील कामाची तयारी याद्वारे सर्वांगीण विकास सुनिश्चित करते.

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्रुप सीएसआरच्या सीनियर व्हाईस प्रेसिडंट रिधी भाटिया म्हणाल्या, “शिक्षण हे दीर्घकालीन सामुदायिक विकासाच्या सर्वात शक्तिशाली चालकांपैकी एक आहे. तथापि, अनेक पात्र तरुण स्त्रियांसाठी, आर्थिक अडचणी त्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर व्यावसायिक उच्च शिक्षणाची उपलब्धता मर्यादित ठेवत आहेत.

कोटक कन्या स्कॉलरशीप’च्या माध्यमातून, आम्ही हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो की आर्थिक परिस्थिती नव्हे तर गुणवत्ता आणि महत्वाकांक्षा-एका तरुणीचे भविष्य घडवतात. ज्यामुळे तिला तिच्या क्षमतेचा शोध घेता येईल आणि स्वत:चे कुटुंब, समुदायासाठी आणि त्यापलीकडे कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करता येईल.”

कोटक कन्या स्कॉलरशीप प्रोग्रामच्या प्रमुख आणि कोटक एज्युकेशन फाऊंडेशनच्या एक्झिक्यूटीव्ह कमिटी मेंबर (ईसी) आरती कौलगुड म्हणाल्या, “आम्ही कोटक कन्या स्कॉलरशीप’चा पहिला यशस्वी निकाल साजरा करत असताना, आमच्या प्रतिभावंतांनी एक तरंग निर्माण केल्याचे पाहून आम्हाला अभिमान वाटतो. आघाडीच्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि भारतातील आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सामील होण्यापासून ते आमचे पहिले डॉक्टर म्हणून पदवी प्राप्त करण्यापर्यंत, ते केवळ त्यांच्या स्वतःच्या आकांक्षाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांची स्वप्ने देखील पूर्ण करत आहेत. त्यांचे यश आम्हाला आणखी 500 पात्र तरुण स्त्रियांना ही संधी देण्यासाठी प्रेरित करते.

आमची कठोर निवड आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणे आम्हाला सर्वात प्रभावी शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी एक बनवते. पारंपरिकपणे कमी प्रतिनिधित्व असलेल्या क्षेत्रांमध्ये अधिक महिलांना करिअर करण्यास सक्षम करून, आम्ही अधिक लिंग-संतुलित कार्यबल तयार करण्यास मदत करत आहोत. आम्ही भारतातील सर्वात हुशार तरुणींना अर्ज करण्यासाठी आणि परिवर्तनाची पुढची पिढी बनण्यासाठी प्रोत्साहित करतो.”

Education Loan: उच्च शिक्षणासाठी आता पैशांची अडचण नाही! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळते विना-तारण कर्ज

शिष्यवृत्तीची ठळक वैशिष्ट्ये:

1. ₹ 1.5 लाख प्रति विद्यार्थी प्रति वर्ष व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम/पदवी पूर्ण होईपर्यंत
2. एनआयआरएफ मान्यताप्राप्त संस्थांमध्ये इंजिनिअरिंग, एमबीबीएस, आर्किटेक्चर, डिझाईन आणि इंटीग्रेटेड एलएलबी यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम समाविष्ट आहेत.
3. मार्गदर्शन, जीवन कौशल्ये आणि मानसिक कल्याण सत्रांमध्ये प्रवेश
4. भारतातील 136 सर्वोच्च संस्थांमधील प्रतिभावंत

कोटक कन्या स्कॉलरशीप 2026-27 करिता पात्रता निकष:

• भारतभरातील गुणवान विद्यार्थिनींसाठी खुले
• 12वीच्या बोर्ड परीक्षेत 75% किंवा अधिक गुण (किंवा समकक्ष सीजीपीए) मिळवलेले असावेत.
• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹6,00,000 पेक्षा कमी असावे
• एनआयआरएफ किंवा एनएएसी मान्यताप्राप्त संस्थेत इंजिनिअरिंग, एमबीबीएस, इंटिग्रेटेड एलएलबी (5 वर्षे) इंटिग्रेटेड बीएस-एमएस/बीएस-रिसर्च (आयआयएसईआर, आयआयएससी बंगळुरू) डिझाइन किंवा आर्किटेक्चर सारख्या प्रवाहात व्यावसायिक पदवी कार्यक्रमाच्या (2026-27) पहिल्या वर्षात प्रवेश मिळवलेला असावा.
• कोटक महिंद्रा ग्रुप, कोटक एज्युकेशन फाउंडेशन आणि बडीस्टडीच्या कर्मचाऱ्यांची मुले अर्ज करण्यास पात्र नाहीत.

AI in Management Education: एआयच्या युगात व्यवस्थापन शिक्षणात कसे बदल होत आहेत? जाणून घ्या सविस्तर!

केईएफच्या शिष्यवृत्ती शाखेने आतापर्यंत 4,000 हून अधिक यशवंतांना पाठिंबा दिला असून 2000 हून अधिक माजी विद्यार्थी आता आघाडीच्या कंपन्या आणि इतर संस्थांमध्ये व्यावसायिक म्हणून भरभराटीला आले आहेत.

Web Title: Kotak kanya scholarship 2026 eligibility marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • education
  • Kotak Bank
  • Kotak Education Foundation

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
2

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
4

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.