फोटो सौजन्य - Social Media
IBPS मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना आजच्या आज अर्ज करणे भाग आहे. कारण शेवटची तारीख अगदी उद्यावर आली आहे. तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर घाई करण्यास सुरुवात करा. २१ जुलै २०२५ रोजी अर्ज करण्याची विंडो बंद करण्यात येणार आहे. उमेदवारांना या भरतीमध्ये SO तसेच PO पदांसाठी अर्ज करता येणार आहे. SO म्हणजे Specialist Officers! या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांनी www.ibps.in या संकेतस्थळाला भेट द्या. संपूर्ण भारतभरात ही भरती आयोजित करण्यात आली आहे. एकूण १००७ SO च्या पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
१ जुलै ते २१ जुलैच्या दरम्यान ही भरती आयोजित करण्यात आली होती. SO पदासाठी अर्ज करणाऱ्या SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹175 रुपये भरायचे आहे. तर General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹850 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. संबंधित क्षेत्रात Degree/ Diploma धारक उमेदवारांना SO पदासाठी अर्ज करता येऊ शकते. किमान २० वर्षे आयु असणारे तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या SO पदासाठी अर्ज करू शकतात. प्रलिमिनारी परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच मुलाखतींना पार करत नियुक्ती मिळवता येईल.
PO म्हणजे Probationary Officer! या भरतीसाठीदेखील अर्ज करण्याची मुदत उद्यापर्यंत देण्यात आली आहे. SC/ST/PwBD या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹175 रुपये भरावे लागणार आहे. तर General/OBC/EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ₹850 रुपये भरावे लागणार आहे. PO पदासाठी एकूण 5208 पदे रिक्त असून पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. किमान २० वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच नियुक्तीच्या टप्प्यांमध्ये . प्रलिमिनारी परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच मुलाखतींना पार करावे लागणार आहे.