Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा केंद्राच्या हातात? शाळांच्या आणि शिक्षकांच्या अधिकारावर गदा

मुंबईमध्ये पहिली ते आठवीच्या परीक्षेसाठी केंद्रीकृत पद्धतीवर शिक्षक संघटनांचा तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने हा निर्णय कायदेशीर व शैक्षणिक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 25, 2026 | 04:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

इयत्ता पहिली ते आठवीच्या द्वितीय सत्र परीक्षेसाठी केंद्रीकृत नियंत्रण पद्धती लागू करण्याच्या प्रस्तावावर शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने या निर्णयाला कायदेशीर, घटनात्मक आणि शैक्षणिक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे.

कॉपीमुक्त अभियानात नव्या उपक्रमाची भर! टोकन पद्धती… प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकाची नोंद

मंडळाच्या मते, प्राथमिक शिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया भीतीमुक्त, आनंददायी आणि बालमैत्रीपूर्ण असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सातत्यपूर्ण आणि सर्वंकष पद्धतीने शाळास्तरावरच होणे गरजेचे आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी ही शाळा आणि शिक्षकांवरच सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ही जबाबदारी केंद्रीकृत यंत्रणेकडे देणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय, केंद्रीकृत परीक्षा प्रणाली लागू झाल्यास शाळांच्या स्वायत्ततेवर परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षकांच्या व्यावसायिक स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ शकतात आणि विद्यार्थ्यांवर अनावश्यक शैक्षणिक ताण वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील गरजा आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शिक्षण देण्याची लवचिकता कमी होईल, असेही मंडळाचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षक विकास मंडळाने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षांचे सर्वाधिकार मुख्याध्यापक आणि संबंधित शाळांकडेच कायम ठेवावेत, कोणतीही केंद्रीकृत परीक्षा प्रणाली लागू करू नये, तसेच शाळांच्या शैक्षणिक कामकाजात बाह्य प्रशासकीय हस्तक्षेप टाळावा. यासोबतच शाळांच्या स्वायत्ततेबाबत स्पष्ट शासन परिपत्रक जारी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पसंतीची शाळा निवडण्यावर मर्यादा! पालकांमध्ये नाराजी, RTI अंतर्गत प्रवेश ठरतंय गैरफायदेशीर? 

एकूणच, शिक्षण क्षेत्रातील स्वायत्तता, विद्यार्थ्यांचे हित आणि कायदेशीर तत्त्वांचे संरक्षण लक्षात घेऊन शासनाने संतुलित आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Annual examination of classes 1 to 8 in the hands of the center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
1

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
2

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका
3

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख
4

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.