फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी त्याच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मंत्रालयाची वाट धरली होती. राज्यभरातील शिक्षक वर्गाने मोठ्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानात उपस्थिती लावली होती. या आंदोलनात विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी एक पाठिंबा म्हणून सहभाग घेतला होता. मुळात, हे आंदोलन आपले थकीत वेतन मिळावे म्हणून राज्यातील तमाम विनाअनुदानित शिक्षकांतर्फे छेडण्यात आले होते. या आंदोलनातून या मागण्यांची मांडणी करण्यात आली. महत्वाचे म्हणजे या मागण्या पूर्ण होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
पावसाळी अधिवेशन सुरु आहे. शिक्षणाच्या या मागण्यांनी या अधिवेशनामध्ये जोर धरला होता.अखेर या मागण्यांवर सुनावणी करण्यात आली आहे. सरकारने या शिक्षणाचे थकीत वेतन देण्याचे तर निश्चित केलेच आहे, त्याचबरोबर शिक्षणांना अतिरिक्त अनुदानही देण्यात येणार आहे. हे अनुदान १ ऑगस्टपर्यंत शिक्षणाच्या खात्यात जमा होणार आहे.
मुंबईच्या आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते, त्यांना अखेर दिलासा मिळाला. येत्या १ ऑगस्ट पासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा सरकारने केली. सर्व शिक्षकांच्या एकीचे बळ दिसून आले. विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी या आंदोलनात…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 18, 2025
विनाअनुदानित शिक्षकांना त्यांचे थकीत वेतन जाहीर तसेच अतिरिक्त अनुदान मिळण्याच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षातील तसेच सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या निर्णयाचे स्वागत केले आहे. अशामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या X वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “मुंबईच्या आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते, त्यांना अखेर दिलासा मिळाला. येत्या १ ऑगस्ट पासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा सरकारने केली. सर्व शिक्षकांच्या एकीचे बळ दिसून आले. विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी या आंदोलनात उतरून शिक्षकांना पाठिंबा दिला. आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब स्वतः आंदोलन स्थळी उपस्थित राहिले. त्यामुळे शिक्षकांच्या निर्धाराला ताकद मिळाली. मी सुद्धा आंदोलक विनाअनुदानित शिक्षकांची भेट घेतली. सभागृहात त्यांच्या मागण्या लावून धरल्या. टप्पा अनुदानाची तारीख जाहीर करा असा आग्रह माझ्या सहकाऱ्यांसह धरला. त्याची दखल घेत, ९७० कोटी रुपये जाहीर करत शिक्षकांना दिलासा दिल्याबद्दल सरकारचे आभार.”