विभाग. कॅप प्रवेश
एकूण- ३७१४८४
इन-हाऊस कोट्यातील नव्या नियमांमुळे ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेतील इन-हाऊस कोट्यासंदर्भातील नव्या सुधारीत नियमांमुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे कठीण झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी हा नियम तात्काळ रद्द करून पूर्वीच्या नियमांप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उपसंचालक, उच्च माध्यमिक, पुणे विभाग, आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक), पुणे जिल्हा परिषद, पुणे. यांच्याकडे केली आहे.