Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Mumbai News: धक्कादायक! आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याने संपवल जीवन; हॉस्टेलच्या ९ व्या मजल्यावरून मारली उडी, नेमकं कारण काय?

२१ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे आयआयटीमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून कॅम्पसमध्ये शोककळा पसरली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 04, 2026 | 06:30 PM
धक्कादायक! आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याने संपवल जीवन (Photo Credit- X)

धक्कादायक! आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याने संपवल जीवन (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • धक्कादायक! आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्याने संपवल जीवन
  • हॉस्टेलच्या ९ व्या मजल्यावरून मारली उडी
  • नेमकं कारण काय?
IIT Mumbai Student Suicide: देशातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Mumbai) पवई कॅम्पसमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे आयआयटीमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून कॅम्पसमध्ये शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना आणि ओळख

मृत विद्यार्थ्याचे नाव नमन अग्रवाल असून, तो भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) पवई येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या (स्थापत्य अभियांत्रिकी) द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. नमन मूळचा राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी होता.

A 21-year-old IIT Bombay student allegedly died by suicide after jumping from the terrace of the hostel, Mumbai Police said. The deceased has been identified as Naman Agarwal. Read more here:https://t.co/OFbJk1L5Em#iitbombay #SuicideCase #hostelterrace #MumbaiPolice pic.twitter.com/TIF6Lt5mlR — IndiaTV English (@indiatv) February 4, 2026


मिळालेल्या माहितीनुसार, नमनने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून अचानक खाली उडी मारली. उंचावरून पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा आवाज होताच सुरक्षा रक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत नमनचा प्राण गेला होता. या दुर्घटनेने त्याचे वर्गमित्र आणि शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. नमन हा अभ्यासात अत्यंत हुशार विद्यार्थी असल्याचे त्याच्या ओळखीच्या लोकांनी सांगितले.

Karnatak Crime: कर्नाटकात थरारक हत्याकांड! भररस्त्यात 16 वार; मृतदेहावर पाय ठेवून आरोपीने पोलिसांची पाहिली वाट

पवई पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नमनचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. नमनने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली असून त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपची तांत्रिक तपासणी केली जात आहे. पोलिसांनी नमनच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली आहे.

कॅम्पसमध्ये मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

आयआयटी मुंबईतील या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न चर्चेत आला आहे. आयआयटी व्यवस्थापनाने या घटनेवर शोक व्यक्त केला असून विद्यार्थ्यांसाठी असलेल्या समुपदेशन सेवांचा अधिक विस्तार करण्याबाबत विचार सुरू केला आहे. “तरुणांच्या मनातील द्वंद्व ओळखून त्यांना वेळीच मानसिक आधार देणे ही काळाची गरज आहे,” असे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

Web Title: Iit bombay civil engineering student naman agarwal suicide powai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • IIT Bombay
  • Student
  • Sucide News

संबंधित बातम्या

Gadchiroli News: आश्रमशाळा की गुरांचा गोठा? विद्यार्थी भोजन कक्षात गुरांचा ठिय्या, लाहेरी आश्रमशाळेतील प्रकार
1

Gadchiroli News: आश्रमशाळा की गुरांचा गोठा? विद्यार्थी भोजन कक्षात गुरांचा ठिय्या, लाहेरी आश्रमशाळेतील प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.