Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉ विद्यार्थ्यांनी धरली कोर्टाची वाट! All India परीक्षेत घडलेल्या प्रकारांमुळे नाराजी

ऑल इंडिया बार परीक्षेत स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांचा अभाव, दुर्गम केंद्रे व अपुरी वाहतूक यामुळे परीक्षार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागल्याचा आरोप.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 05, 2025 | 03:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • स्वच्छता आणि सुरक्षा पुरवण्यात अपयश आल्याचाही आरोप
  • हतुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थी वाटेतच अडकले
  • परीक्षेसाठी नेमण्यात आलेले निरीक्षक व कर्मचारी अपुऱ्या प्रशिक्षणप्राप्त
बॉम्बे सिटी लॉयर ग्रुप्समधील कायद्याचे पदवीधर आणि तरुण वकिलांच्या एका समूहाने ऑल इंडिया बार परीक्षेदरम्यान व्यापक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ३० नोव्हेंबरला झालेल्या या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडे पत्र लिहून स्वतःहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या पत्रात मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, नालासोपारा आणि वसई येथील अनेक परीक्षा केंद्रांवर झालेल्या अतिगंभीर प्रशासकीय त्रुटींचा उल्लेख आहे. बार काऊन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय), महाराष्ट्र आणि गोवा राज्य बार काऊन्सिल तसेच परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा या सर्वांनीच मूलभूत सोयीसुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा पुरवण्यात अपयश आल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी

दुर्गम परीक्षा केंद्रे, वाहतुकीची गैरसोय

अनेक परीक्षा केंद्रे दुर्गम, गाठायला कठीण आणि वाहतुकीच्या दृष्टीने अयोग्य ठिकाणी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ परीक्षार्थी, महिला आणि दिव्यांग उमेदवारांना केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेक विद्यार्थी वाटेतच अडकले, किंबहुना परीक्षा वेळेत देणेही त्यांच्या अवघड झाले.

प्रशिक्षण नसलेले निरीक्षक; तक्रार निवारण यंत्रणा गायब

परीक्षेसाठी नेमण्यात आलेले निरीक्षक व कर्मचारी अपुऱ्या प्रशिक्षणप्राप्त असून पूर्णतः अनभिज्ञ असल्याचा गंभीर उल्लेख विद्यार्थ्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, तक्रार निवारण कक्ष किंवा कोणतीही तात्काळ कार्यवाही यंत्रणा अनेक केंद्रांवर पूर्णतः अनुपस्थित होती.
या सर्व त्रुटींमुळे अनेक परीक्षार्थ्यांना परीक्षेदरम्यान मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले, असे पत्रात नमूद आहे.

अनेक परीक्षा केंद्रांवर शौचालये बंद अथवा अस्वच्छ, पाण्याची व्यवस्था नसलेली, तसेच गोपनीयतेच्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे महिला परीक्षार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला, हे पत्रात स्पष्टपणे नमूद आहे. तसेच पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन सहाय्य यांसारख्या अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नव्हत्या. यामुळे परीक्षार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये अतिगर्दी, तुटकी आसने, अपुरा वायुवीजन (व्हेंटिलेशन) आणि बसण्याची निकृष्ट व्यवस्था असल्याच्याही तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. काही केंद्रांवर उष्णता आणि हवा न खेळल्यामुळे घुसमट निर्माण झाल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन

मार्गदर्शक तत्त्वे आणि समिती स्थापनेची मागणी

विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत:

  • परीक्षा केंद्रांची निवड आणि यंत्रणांची माहिती पारदर्शकपणे जाहीर करावी
  • देशभरातील भविष्यातील परीक्षांसाठी अनिवार्य मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत
  • तसेच परीक्षा व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती, वरिष्ठ वकील आणि शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेली उच्चस्तरीय पर्यवेक्षण समिती स्थापन करावी
या सर्व त्रुटींचा विचार करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

Web Title: Law students upset over the incidents that took place in the all india examination are waiting for the court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 03:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.