संग्रहित फोटो
भूवैज्ञानिक पदांसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर म्हणजे २०१३ नंतर थेट २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती. आयोगाने १९ डिसेंबर २०२२ रोजी वरिष्ठ भूवैज्ञानिक (१९), सहाय्यक भूवैज्ञानिक (३६) आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक (१०२) अशी एकूण १५७ पदांची जाहिरात प्रकाशित केली होती. मात्र, त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी एप्रिल २०२५ मध्ये संयुक्त चाळणी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर विभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या. कनिष्ठ भूवैज्ञानिकांच्या मुलाखती १९ व २० ऑगस्ट, सहाय्यक भूवैज्ञानिकांच्या ९ व १० सप्टेंबर, तर वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्या २२ सप्टेंबर रोजी पार पडल्या.
उमेदवारांची कंत्राटी भरतीवर तीव्र नाराजी
ज्या विभागासाठी स्थायी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याच विभागाने २५ सप्टेंबर रोजी तातडीच्या कामांसाठी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यासाठी परिपत्रक काढले आहे. या निर्णयावरती उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
परिक्षेचा निकाल हा तीन वर्षापासून रखडलेला असून, आयोगाने त्वरीत निकाल लावावा ही आमची मागनी आहे. कारण विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. विद्यार्थांना समाजीक, आर्थीक आडचनीना सामोरे जावे लागत आहे. महागड्या शाहरात राहनं खूप कठीन होत चाललं आहे. त्यामुळे लवकर निर्णय घ्यावा ही मागणी आहे. -महेश घरबुडे (अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन)






