Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LLB CET Result 2026 : तीन वर्षीय लॉ CET चा निकाल जाहीर; ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवत मारली बाजी

LLB CET Result 2026 : एप्रिल २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या तीन वर्षीय विधी या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 05:34 PM
LLB CET Result 2026

LLB CET Result 2026

Follow Us
Follow Us:
  •  तीन वर्षीय लॉ CET चा निकाल जाहीर
  • ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवत मारली बाजी
  • एकूण ८३ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी
MHT CET Law 2026 Result : पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या तीन वर्षीय विधी या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या सीईटी परीक्षेमध्ये ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यातील २ विद्यार्थी राज्यातील असून २ विद्यार्थी इतर राज्यातील आहेत.

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त

तीन वर्षीय विधी सीईटी प्रवेश परीक्षा दि. १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवसात चार सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण ८३ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत चार सत्रात मिळून ६९ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ४५ हजार १११ विद्यार्थी, २४ हजार ३५८ विद्यार्थिनी होत्या तर ४ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. याला ८३.२१% विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

हि सीईटी परीक्षा राज्यातील ६७ हजार ९४९ तर राज्याबाहेरील १५२४ विद्यार्थ्यांनी दिली. हि सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यातील १५६ परीक्षा केंद्रावर संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही.

१०० पर्सेंटाईल गुण मिळविणारे ४ विद्यार्थी

विधी सीईटीमध्ये ४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील मुंबई उपनगरातील अमेय विश्वेश राजगुरू आणि ठाणे येथील जीत संजय बर्दापूरकर या दोन विद्यार्थ्यांनी तर पूर्व दिल्लीतील अक्षत भारद्वाज आणि राजस्थानमधील सीकर येथील मोहम्मद रिजवान या राज्याबाहेर विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत.

प्रवर्गनिहाय सर्वोच्च पर्सेंटाईल मिळवणारे विद्यार्थी

खुला प्रवर्ग पर्सेंटाईल

  • अमेय विश्वेश राजगुरू, मुंबई उपनगर -१००
  • जीत संजय बर्दापूरकर, ठाणे – १००
एससी प्रवर्ग (एससी)
  • रोशन विलास वनमाळी ,पालघर – ९९.९८
एसटी प्रवर्ग (एसटी)
  • अक्षय रमेश विरनाक , ठाणे – ९९.६२
डीटी/ व्हिजे प्रवर्ग (डीटी वीजे)
  • विशाल शामराव पवार, परभणी – ९९.९९
एनटी १ बी प्रवर्ग (एनटी१बी)
  • अक्षय अशोक मेश्राम,गडचिरोली – ९९.९७
एनटी २ सी प्रवर्ग (एनटी२सी)
  • अविनाश भगवान घुटूकडे,सातारा – ९९.९८
एनटी ३ डी प्रवर्ग (एनटी३डी)
  • आदिती संतोष कुटे, नाशिक – ९९.९५
ओबीसी प्रवर्ग (ओबीसी)
  • भगवान अजस महिमुड, बीड- ९९.९९
  • प्रेम प्रमोद घाटोळ, अकोला – ९९.९९
एसबीसी प्रवर्ग (एसबिसी)
  • सुरभी गिरीधर लाटणे, सोलापूर – ९९.७३
एसइबीसी प्रवर्ग (एसइबीसी)
  • ओम संतोष जाधव, पुणे – ९९.९८
NEET Paper Leak: नीट यूजी पुनर्परिक्षेचा पेपर खरोखरच लीक झालाय? सोशल मीडियावरील दाव्यांनंतर NTA ने नेमका काय दिलाय इशारा?

Web Title: Llb cet result 2026 3 year law cet result declared 4 students score 100 percentile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • CET
  • Maharashtra Education
  • Marathi News

संबंधित बातम्या

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी
1

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर तुफान वाढला! महिन्याभरात 2 लाख कोटींहून अधिक खर्च; ‘हे’ दोन बँक अव्वल स्थानी

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये
2

बापरे! सर्वात महागडा घटस्फोट… 35 वर्षांचा संसार मोडला, ‘हा’ बिझनेसमॅन पत्नीला देणार तब्बल 82 अब्ज रुपये

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी
3

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी

Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा! बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी; सरकारने दिला इशारा
4

Air Suvidha 2.0 च्या नावाखाली ऑनलाईन घोटाळा! बनावट वेबसाईटवरुन पैशांची मागणी; सरकारने दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.