फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET UG 2026 Paper Leak: वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट यूजी २०२६’ च्या पुनर्परिक्षेबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या पेपर लीकच्या अफवांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून २१ जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे तसेच आधीच पेपर उपलब्ध असल्याचे आणि तो विकला जात असल्याचे दावे करण्यात आले आहेत. ते सर्व दावे पूर्णपणे खोटे, बनावट आणि दिशाभूल करणारे असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये आणि कोणालाही पैसे देऊ नयेत, अशी सक्त ताकीद एजन्सीने दिली आहे.
एनटीएने अधिकृत निवेदनाद्वारे सांगितले की, सोशल मीडियावर केले जाणारे सर्व दावे संघटित कॉपी बहाद्दर माफिया आणि ठगांचे आहे. ही टोळी परीक्षेच्या काळात विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक तणावाचा आणि घाईगडबडीचा गैरफायदा घेऊन बनावट पेपर विकून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा धंदा चालवत आहे. परंतु, हे पूर्णपणे निरर्थक असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.
1) परीक्षा पूर्णपणे सुरक्षित: परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित पार पडण्यासाठी एनटीएकडून आवश्यक कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
2)बनावट अकाउंट्सवर कारवाई: सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या अशा सर्व चॅनेल्स आणि अकाउंट्सचा शोध एनटीएची सायबर टीम घेत असून लवकरच ते अकाउंट बंद होतील.
3) कायदेशीर तक्रार दाखल होणार: अशा प्रकारच्या बनावट मजकूर तयार करणाऱ्या, पुढे फॉरवर्ड करणाऱ्याविरोधात एनटीए पोलीस आणि सायबर क्राईम सेलकडे कायदेशीर तक्रार(F.I.R.) दाखल करत आहे. अशा प्रकरणामध्ये सामील असले्लयांवर कठोर करवाई केली जाईल.
4) पालकांनी अमिषाला बळी पडू नये: उमेदवार आणि पालकांना असा सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी अशा कोणत्याही मेसेजला पुढे फॉरवर्ड करू नये आणि या ठगांना पैशा्च्या स्वरूपात कोणतीही रक्कम देऊ नये.






