
Image
यानुसार चौथी यादी जाहीर करण्यात आली. या चौथ्या यादीत तिन्ही अभ्यासक्रमाच्या राज्यात २०८ आयुष महाविद्यालयात १४ हजार २०५ जागांपैकी ११ हजार ५९१ जागेवर तिसऱ्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. १ हजार ९७९ विद्यार्थ्यांना चौथ्या विशेष यादीत प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर ६३५ जागा रिक्त आहेत, या रिक्त जागा स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील. स्ट्रे राऊंडचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
आयुर्वेद-बीएएमएस (BAMS) याअभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यात १४१वैद्यकीय महाविद्यालयात ९ हजार ५७९ जागांपैकी ८हजार १५१ विद्यार्थ्यांना प्रवेशघेतला आहे. चौथ्या फेरीत १ हजार२७७विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये १५१ जागा रिक्त आहेत.यामध्ये २४शासकीय महाविद्यालयात २२२व ११७ खासगी महाविद्यालयात १०५५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे.
होमिओपॅथी-बीएचएमएस (BHMS)याअभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यात ५९वैद्यकीय महाविद्यालयात४ हजार १९६ जागांपैकी ३ हजार ०४२ विद्यार्थ्यांना प्रवेशघेतला आहे. चौथ्या फेरीत ६७०विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये४८४ जागा रिक्त आहेत.यामध्ये २शासकीय महाविद्यालयात ३० व ५७खासगी महाविद्यालयात ६४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे.
युनानी-बीयुएमएस (BUMS)याअभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यात ८वैद्यकीय महाविद्यालयात ४३० जागांपैकी ३९८ विद्यार्थ्यांना प्रवेशघेतला आहे. चौथ्या फेरीत ३२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये ३ शासकीय महाविद्यालयात १ व ५ खासगी महाविद्यालयात ३१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे.
ज्या विद्यार्थ्यांना चौथ्याविशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी दिनांक १७ नोव्हेंबर२०२६सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
Ans: बुलढाणा येथे नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला प्रथमच परवानगी मिळाल्यामुळे आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये नियमांनुसार बदल करता येत नसल्यामुळे, उच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी राज्य सरकारने ही विशेष चौथी फेरी आयोजित केली होती.
Ans: या चौथ्या फेरीत BAMS साठी १,२७७ विद्यार्थ्यांना, BHMS साठी ६७० विद्यार्थ्यांना आणि BUMS साठी ३२ विद्यार्थ्यांना अशी एकूण १,९७९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
Ans: ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या विशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.