Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Minority Certificate Rules: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ‘या’ ३ पुराव्यांच्या आधारे मिळणार थेट प्रवेश!

Maharashtra Minority Certificate Rules : राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी अल्पसंख्याक दाखल्याची सक्ती करू नये, असे आदेश अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. वैध पुराव्यांची यादी वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 30, 2026 | 09:02 AM
certificate

certificate

Follow Us
Follow Us:

Maharashtra Minority Certificate Rules : राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राची/दाखल्याची सक्ती केली जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. शासन निर्णयानुसार विहित केलेले पुरावे ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

महाराष्ट्र शासनाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन आणि ज्यू या ७ लोकसमूहांना ‘अल्पसंख्याक लोकसमूह’ म्हणून घोषित केले आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार राज्य शासनाकडून धार्मिक अथवा भाषिक अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना वैयक्तिक स्तरावर कोणतेही वेगळे अल्पसंख्याक प्रमाणपत्र किंवा दाखला दिला जात नाही. सध्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना, काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राची मागणी केली जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

NEET Result Controversy: NTA पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली! बिंदुश्री पवारचे NEET पुनर्रपरीक्षेच्या निकालावर गंभीर आरोप!

अल्पसंख्याक असल्याचा वैध पुरावा

या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विकास विभागाने स्पष्ट केले आहे की, १ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानुसार खालीलपैकी कोणताही एक पुरावा अल्पसंख्याक असल्याचा वैध पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा:

१. शाळा सोडल्याच्या दाखल्यातील, प्रवेश नोंदवहीतील किंवा शालेय अभिलेखातील धर्म अथवा मातृभाषेची नोंद.

२. शालेय अभिलेखात नोंद नसल्यास: संबंधित धर्मप्रमुख किंवा नोंदणीकृत संस्थेने दिलेले प्रमाणपत्र (उदा. बाप्तिस्मा प्रमाणपत्र, दीक्षा प्रमाणपत्र इत्यादी).

३. पालकांचे शपथपत्र.

Rajesh Gopakumar: IIT-JEE Top केल्यानंतर सोडली इंजिनिअरिंग; कोण आहेत जगात डंका वाजवणारे भारतीय शास्त्रज्ञ राजेश गोपाकुमार?

अल्पसंख्याक विकास विभागाचे आवाहन

या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, व्यवसाय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण व संशोधन तसेच आयुर्वेद संचालनालयाच्या पुणे व मुंबई येथील संचालकांना २१ जुलै २०२६ रोजीच्या पत्रान्वये पुन्हा एकदा कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणताही पात्र अल्पसंख्याक विद्यार्थी केवळ प्रमाणपत्राच्या अभावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची सर्व अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागाने केले आहे.

Web Title: Maharashtra govt no individual minority certificate rules mandatory for admissions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • Government Certificate
  • Minority Students
  • new rules

संबंधित बातम्या

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई
1

Government Exam Rules: परीक्षा केंद्रावर छेडछाड पडणार महागात; SSC च्या ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई
2

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई

Gas ग्राहकांसाठी मोठी बातमी! LPG Cylinder Booking बाबत सरकारने घेतला निर्णय, ‘या’ कडक नियमांत केला बदल
3

Gas ग्राहकांसाठी मोठी बातमी! LPG Cylinder Booking बाबत सरकारने घेतला निर्णय, ‘या’ कडक नियमांत केला बदल

बॅगभरुन बाटल्या… Trainमधून Alcohol नेणं पडलं महागात! बिहारच्या तरुणीला अटक; काय सांगतो कायदा?
4

बॅगभरुन बाटल्या… Trainमधून Alcohol नेणं पडलं महागात! बिहारच्या तरुणीला अटक; काय सांगतो कायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.