
medical admission
Maharashtra Medical Admission 2026 CAP Round 2 Result : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रमाच्या राज्याच्या कोट्यांतर्गत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत दोन्ही अभ्यासक्रमाच्या ११ हजार १९६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ९ हजार २६५ म्हणजे ८२.७५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर १ हजार ९३१ जागा रिक्त आहेत, या जागा तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध आहेत.
राज्यात एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ८ हजार ५७९ जागांपैकी ७ हजार ६३० म्हणजे ८८.९३ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. यामध्ये राज्यात ४२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ४९८० जागा आहेत. या पैकी ४८२५ म्हणजे ९६.८८ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व १५५ जागा रिक्त आहेत. तर २३ खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ३१४९ जागा आहेत.
या पैकी २ हजार ६२५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ५२४ जागा रिक्त आहेत. तसेच २ खासगी वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या ४५० जागा आहेत. या पैकी १८० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व २७० जागा रिक्त आहेत. असे राज्यात ६७ वैद्यकीय महाविद्यालयात व विद्यापीठात एकूण एमबीबीएसच्या ८ हजार ५७९ जागा आहेत. यापैकी ७ हजार ६३० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ९४९ जागा रिक्त आहेत.
बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत २ हजार ६१७ जागांपैकी १ हजार ६३५ म्हणजे ६२.४७ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. यामध्ये राज्यात ५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएस च्या ३१७ जागा आहेत.
यापैकी २५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ६३ जागा रिक्त आहेत. तर २३ खासगी वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या २२०० जागा आहेत. यापैकी १३४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ८५४ जागा रिक्त आहेत. व एका खासगी वैद्यकीय विद्यापीठात बीडीएसच्या १०० जागा आहेत. यापैकी ३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ६५ जागा रिक्त आहेत. सध्या राज्यात २९ वैद्यकीय महाविद्यालयात व विद्यापीठात एकूण बीडीएसच्या २६१७ जागा आहेत. यापैकी १६३५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत व ९८२ जागा रिक्त आहेत.
| अभ्यासक्रम | एकूण जागा | झालेले प्रवेश | रिक्त जागा | टक्केवारी |
| एमबीबीएस (MBBS) |
८,५७९ |
७,६३० |
९४९ |
८८.९३% |
| बीडीएस (BDS) |
२,६१७ |
१,६३५ |
९८२ |
६२.४७% |
| एकूण |
११,१९६
|
९,२६५
|
१,९३१
|