फोटो सौजन्य- सोशल मीडिया
यासाठी तालुका स्तरावरून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र शासनाने मुख्याध्यापकांकडून एसओ २ प्रपत्र भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी हे प्रपत्र भरून देणे आवश्यक आहे.
तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये यापूर्वी नोंदणी झालेली नाही, याची खात्री करून घ्यावी. त्यानंतरच विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी तालुका स्तरावरील एमआयएस समन्वयक/डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्याकडे आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
MPSC गट ‘ब’ नियुक्तीला अचानक ब्रेक! SIT चौकशीचा निष्पाप उमेदवारांना फटका?
विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित एसओ २ प्रपत्र तालुका स्तरावर जतन करून ठेवण्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत होण्यास मदत होणार आहे.






