Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! MBBS ची फीस थेट ५६ टक्क्यांनी वाढली; एका झटक्यात १ कोटींवर पोहोचला शिक्षणाचा खर्च!

MBBS Fee Hike 2026 : नागपूरच्या एनकेपी साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे खाजगी वैद्यकीय विद्यापीठात रूपांतर झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच एमबीबीएसच्या फीमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 13, 2026 | 07:56 PM
MBBS

MBBS

Follow Us
Follow Us:

MBBS Fee Hike 2026 : महाराष्ट्रात खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस (MBBS) करण्याचे तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी फीशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरच्या एनकेपी साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे खाजगी वैद्यकीय विद्यापीठात रूपांतर झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच एमबीबीएसच्या फीमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये वार्षिक फी १३.९५ लाख रुपये होती, ती आता वाढवून २१.७५ लाख रुपये प्रतिवर्ष करण्यात आली आहे.

नवीन फीसह दरवर्षी ७.५ टक्के वाढ करण्याची तरतूदही ठेवण्यात आली आहे. यामुळे एमबीबीएसच्या संपूर्ण ५ वर्षांच्या शिक्षणाचा एकूण खर्च सुमारे १.१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. हे आकडे समोर आल्यानंतर एमबीबीएसच्या वाढत्या फीबाबतची चर्चा आणखी तीव्र झाली आहे.

स्टेट आणि ऑल इंडिया कोटाची फी किती?

नवीन फी रचनेनुसार, स्टेट कोट्याच्या ४० टक्के आणि ऑल इंडिया कोट्याच्या ४५ टक्के जागांसाठी ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी २०.७५ लाख रुपये वार्षिक असेल. याशिवाय विद्यार्थ्यांना दरवर्षी १ लाख रुपये विद्यापीठ फी (युनिव्हर्सिटी फी) द्यावी लागेल. तसेच ५ लाख रुपयांची रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिट देखील घेतली जाईल. एनआरआय (NRI) आणि ओसीआय (OCI) विद्यार्थ्यांसाठी वार्षिक फी ४६,६५० अमेरिकन डॉलर निश्चित करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूशनल कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी ४३ लाख रुपये प्रतिवर्ष असेल.

AI and coding: इंग्रजीची भीती संपली! आता मातृभाषेत शिका कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स..

२५० एमबीबीएस जागांवरही लक्ष

एनकेपी साल्वे इन्स्टिट्यूटमध्ये मेडिकल एमबीबीएसच्या एकूण २५० जागा आहेत. खाजगी विद्यापीठात रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या जागा आतापर्यंत केंद्रीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट केल्या गेल्या नव्हत्या. महाराष्ट्र सीईटी सेलच्या एका अधिकाऱ्यामते, वैद्यकीय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे तात्पुरते सीट मॅट्रिक्स जारी झाले आहे. अंतिम सीट मॅट्रिक्समध्ये या कॉलेजचा समावेश केला जाईल.

डेंटल कॉलेजची फी देखील वाढली

याच नवीन खाजगी विद्यापीठाचा भाग बनलेल्या नागपूरच्या रणजीत देशमुख डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटरच्या फीमध्येही वाढ झाली आहे. येथील वार्षिक फी ४.७५ लाख रुपयांवरून वाढवून ५.८५ लाख रुपये करण्यात आली आहे. वास्तविक पाहता, महाराष्ट्र सरकारने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तीन शिक्षण संस्थांना खाजगी विद्यापीठात रूपांतरित करण्याची मंजुरी दिली होती. यामध्ये अहिल्यानगरचे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन मेडिकल कॉलेज, नागपूरचे एनकेपी साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि रणजीत देशमुख डेंटल कॉलेज अँड रिसर्चचा समावेश आहे.

Namo Bharat Recruitment 2026: नमो भारत प्रकल्पात ६७ जागांसाठी भरती; NCRTC मध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी

फी वाढीवर तज्ज्ञ काय म्हणाले?

वैद्यकीय शिक्षण निरीक्षक ब्रिजेश सुटरिया यांनी सांगितले की, एवढी जास्त फी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक मोठा आर्थिक भार आहे. त्यांनी पालकांना सल्ला दिला आहे की, नीट यूजी (NEET UG) काउन्सिलिंगमध्ये कॉलेजचा पर्याय निवडण्यापूर्वी संपूर्ण ५.५ वर्षांच्या अभ्यासाची फी आणि इतर खर्चाचा हिशोब नक्की करून घ्यावा.

Web Title: Maharashtra mbbs fee hike 2026 nkp salve medical college nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • education
  • MBBS
  • Medical Admission

संबंधित बातम्या

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?
1

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित
2

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

Higher Education Fee Hike: इंजिनिअरिंग-मेडिकलच्या फीवाढीवर ब्रेक लागणार? मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे विधान
3

Higher Education Fee Hike: इंजिनिअरिंग-मेडिकलच्या फीवाढीवर ब्रेक लागणार? मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे विधान

UGC-NET 2026 परीक्षा ‘या’ दिवशी सुरू होणार? NTA ने परीक्षा केंद्रावर ‘या’ गोष्टी नेण्याबाबत दिले महत्त्वाचे निर्देश!
4

UGC-NET 2026 परीक्षा ‘या’ दिवशी सुरू होणार? NTA ने परीक्षा केंद्रावर ‘या’ गोष्टी नेण्याबाबत दिले महत्त्वाचे निर्देश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.