फोटो सौजन्य - Social media
महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या विभागाकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. विशेष म्हणजे तब्बल १७ हजार ४७१ पोलिसांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. यामध्ये पोलीस दलातील विविध पदांचा समावेश आहे. या भरतीप्रक्रियेत पोलीस शिपाई पदासाठी ९,५९५ रिक्त जागा, चालक पोलीस शिपाई पदासाठी १,६८६ रिक्त जागा, बॅण्डस्मन पदासाठी 41 जागा तर सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी एकूण ४,३४९ जागा शिल्लक होत्या. तसेच कारागृह शिपाई पदाच्या एकूण १८०० रिक्त जागांसाठी राज्यात ठिकठिकाणी भरती प्रक्रिया घेण्यात येणार होती. या भरती प्रक्रियेसाठी जूनच्या १९ तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत उमजेद्वारांची निवड तीन टप्प्यात घेणार येणार होती. या निवड प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी, कौशल्य चाचणी तससह लिखित परीक्षेचा समावेश आहे. या टप्प्यांच्या अनुषंगानेच उमेदवाराला रिक्त पदांमध्ये स्थान मिळवता आले असते.
हे सुद्धा वाचा : कॉलेजच्या तरूणीला ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली अन्…
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या मुंबई पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये भरती प्रक्रियेतील तब्बल ७०% रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली आहे. भरती प्रक्रियेपैकी ११ हजार ९५६ पदांची निवड प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. उर्वरित रिक्त पदांची निवड लवकरच करण्यात येणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाकडून मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे निविडत उमेदवारांना नियुक्तीपात्र देण्यास सुरुवातही करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : कर्मचाऱ्यांकडून पगारापेक्षाही ‘या’ गोष्टीला दिले जाते महत्व, सर्वेक्षणामधून माहिती आली समोर
गेल्या दोन महिन्यात पोलीस शिपाई पदासाठी निवडीत ७,०२३ उमेदवारांना नियुक्ती पात्र देण्यात आले आहे. मुख्य म्हणजे केवळ मुंबई पोलीस भरती प्रक्रिया शिल्लक आहे. पुण्यातील पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. निवडीत उमेदवारांना लवकरच जिल्हा मुख्यालयात हजर केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिली आहे. तसेच निवडीत उमेदवारांना सप्टेंबर अखेर प्रशिक्षणासाठी रवाना केले जाणार असल्याची माहिती पोलिस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. एकंदरीत, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ११ हजार ९५६ उमेदवारांना सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर शिल्लक जागांसाठी भविष्यात नेमणूक होणाऱ्या उमेदवारांनाही प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल.