Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

पुण्याच्या उपनगरांतील नाट्यगृहांमध्ये कार्यक्रम वाढविण्याची विशेष योजना राबविण्यात येणार असून, सांस्कृतिक धोरणाबाबतही महत्त्वाचे निर्णय लवकरच जाहीर होणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 14, 2026 | 02:37 PM
पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

Follow Us
Close
Follow Us:
  • ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी
  • उपनगरांतील नाट्यगृहांना थंड प्रतिसाद
  • पुण्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर होणार
पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील काही निवडक नाट्यगृहांना आयोजकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना उपनगरांतील अनेक नाट्यगृहे मात्र प्रयोगांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र समोर आले आहे. या असमतोलावर उपाय म्हणून उपनगरांतील नाट्यगृहांमध्ये कार्यक्रम वाढविण्याची विशेष योजना राबविण्यात येणार असून, नाट्यगृहांच्या स्वच्छतेसह सांस्कृतिक धोरणाबाबतही महत्त्वाचे निर्णय लवकरच जाहीर होणार आहेत.

 

महानगरपालिकेचे सांस्कृतिक प्रशासकीय अधिकारी राजेश कामठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि विठ्ठलराव तुपे नाट्यगृह येथे सातत्याने कार्यक्रम होत असतात. मात्र इतर नाट्यगृहांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सांस्कृतिक उपक्रमांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

यासाठी ‘उपनगरातील नाट्यगृहात चार कार्यक्रम आयोजित केल्यास प्रतिसाद असलेल्या नाट्यगृहात एका कार्यक्रमाची तारीख देणे’ अशी योजना प्रस्तावित असून कलाकार, सांस्कृतिक संस्था आणि प्रतिनिधींशी संवाद सुरू असल्याचे कामठे यांनी सांगितले. विशेषतः पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे सर्वात कमी प्रतिसाद मिळत असल्याची नोंद करण्यात आली आहे.

नाट्यगृहांची स्वच्छतागृहे चकाकणार

नाट्यगृहांतील स्वच्छतागृहांबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन चित्रपटगृहांच्या धर्तीवर स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत काम सुरू होणार असून, डासांच्या समस्येवर परिसर स्वच्छतेवरही भर दिला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘Battle of Galwan’ मधील रोमँटिक गाणं रिलीज, Salman आणि Chitrangada यांची पडद्यावर खुलली सुंदर केमिस्ट्री

दोन नवीन नाट्यगृहे यंदाच सुरू होणार

कोथरुड येथे ४५० आसनक्षमतेचे बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह तसेच सिंहगड रोडवर ८०० आसनक्षमतेचे छत्रपती शिवाजीराजे भोसले कलामंदिर या वर्षात सुरू होणार आहेत. सिंहगड रोड परिसरात सध्या नाट्यगृह नसल्याने नव्या नाट्यगृहाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नाट्यगृहांचे वार्षिक उत्पन्न (१ एप्रिल २०२५ – ३१ जानेवारी २०२६)

बालगंधर्व रंगमंदिर – ६६,४२,५१९

गणेश कला क्रीडा मंदिर – ४४,४०,२१८

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह – ५६,४३,५५१

विठ्ठलराव तुपे नाट्यगृह, हडपसर – ४०,६०,६७७

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी – २७,५४,७०४

महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी – १६,४५,८४८

राजा रवि वर्मा कलादालन व पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन – १५,७०,३७४

Web Title: Many theaters in pune city are not getting response from citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल
1

सर्वसाधारण सभेतील संकेतांचा सत्ताधाऱ्यांना विसर; विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर बिडकरांकडून दखल

पुणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्याची नावे जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?
2

पुणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्याची नावे जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?

विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या देशभूमीवर; देहूतून संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे भव्य हस्तांतरण
3

विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या देशभूमीवर; देहूतून संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे भव्य हस्तांतरण

Amravati News: रोबोटच्या मदतीने कापूस वेचणीचा नवा अध्याय, परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा दिलासा
4

Amravati News: रोबोटच्या मदतीने कापूस वेचणीचा नवा अध्याय, परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.