Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोट्या दुकानदारांचे आर्थिक गणित बिघडले; महाशिवरात्रीच्या कालावधीत भीमाशंकर मंदिर राहणार बंद

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर विकासकामांसाठी बंद असल्यामुळे परिसरातील शेकडो लहान व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2026 | 05:30 PM
छोट्या दुकानदारांचे आर्थिक गणित बिघडले; महाशिवरात्रीच्या कालावधीत भीमाशंकर मंदिर राहणार बंद

छोट्या दुकानदारांचे आर्थिक गणित बिघडले; महाशिवरात्रीच्या कालावधीत भीमाशंकर मंदिर राहणार बंद

Follow Us
Follow Us:
  • छोट्या दुकानदारांचे आर्थिक गणित बिघडले
  • महाशिवरात्रीच्या कालावधीत भीमाशंकर मंदिर राहणार बंद
  • मंदिर खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नाही
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर विकासकामांसाठी बंद असल्यामुळे परिसरातील शेकडो लहान व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर मोठा परिणाम झाला असून, दुकानदारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मंदिरातील सभा मंडप व पायरी दर्शन मार्गाच्या कामासाठी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिने मंदिर बंद राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्या नुसार सध्या भाविकांची ये-जा पूर्णपणे थांबली आहे.

 

मंदिर बंद असल्याने प्रसाद विक्रेते, फुलविक्रेते, माळा विक्रेते, नारळ विक्रेते, चहा व नाश्ता दुकाने अशा अनेक छोट्या व्यवसायांवर मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषतः महाशिवरात्रीच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि त्यावेळी प्रसाद, फुले व पूजेच्या साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या काळावरच अनेक दुकानदारांचे वार्षिक उत्पन्न अवलंबून असते. मात्र मंदिर बंद असल्याने भाविकांचा ओघ थांबला असून, दुकाने उघडी ठेवूनही ग्राहक मिळत नसल्याने अनेकांनी तात्पुरती दुकाने बंद केली आहेत. रोजंदारीवर चालणाऱ्या या व्यवसायांवर परिणाम झाल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांची संख्या वाढेल आणि व्यवसाय पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा दुकानदार व्यक्त करत असले तरी सध्याच्या काळात त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

मंदिर बंद असल्याने आमचा फुले विक्रीचा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला आहे. महाशिवरात्रीचा हंगाम आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. तीन महिने दुकान बंद ठेवावे लागल्याने घरखर्च करणे कठीण झाले आहे. -शंकर शेडगे, फुलवाले श्री क्षेत्र भीमाशंकर.

मंदिर खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नाही

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात विकास कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. दगडी बांधकाम सुरू असल्याने तसेच दगड व बांधकाम साहित्य हलविणे शक्य नसल्यामुळे, महाशिवरात्री कालावधीत गुरुवारी ( दि.१२) ते बुधवारी (दि.१८) मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नसल्याचे संस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी सांगितले. श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कामे सध्या प्रगतिपथावर असून, कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे तसेच विकास आराखड्यातील कामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करणे या उद्देशाने यापूर्वी मंदिर तीन महिन्यांसाठी (महाशिवरात्रीचा कालावधी वगळून) तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. पूर्वी भाविकांच्या सोयीचा विचार करून महाशिवरात्री कालावधी (दि.१२ ते १८ फेब्रुवारी) वगळण्यात आला होता. तथापि, सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या कामाचा वेग, व्याप्ती व सुरक्षेच्या बाबींचा सखोल आढावा घेतल्यानंतर, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दगडी बांधकाम सुरू असल्याने तसेच दगड व बांधकाम साहित्य हलविणे शक्य नसल्यामुळे, महाशिवरात्री कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सदर निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून, जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते. या कालावधीत बांधकाम कामे करणे शक्य नसल्याने उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.यामुळे विकास कामांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे. – रमेश येवले, उद्योजक गंगापूर

Web Title: Bhimashankar temple will remain closed during mahashivratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • bhimashankar
  • maharashtra
  • mahashivaratri

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.