Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ तारखेला होणार

शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने यंदा इयत्ता पाचवी व आठवीची अखेरची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 28, 2025 | 06:57 PM
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 'या' तारखेला होणार (फोटो सौजन्य-X)

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 'या' तारखेला होणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने यंदा इयत्ता पाचवी व आठवीची अखेरची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले.

SPJIMR ने नवीन श्वेतपत्रिकेमध्‍ये कुशल आणि चिंतनशील नेतृत्‍वाची असलेली गरज दर्शवली

शासनमान्य शाळांमधून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही परीक्षा ८ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल.

या परीक्षेसाठी प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असे चार विषय असून एकूण ३०० गुणांची ही परीक्षा असेल. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन भरता येईल. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल.

विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच विद्यार्थी शासनमान्य शासकीय/ अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. पाचवी किंवा इ. आठवी मध्ये शिकत असणे आवश्यक आहे. ही परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु आणि कन्नड या सात माध्यमांमध्ये घेतली जाईल. इयत्ता पाचवीतील परीक्षेसाठी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वय ११ वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १५ वर्षे, त्याचप्रमाणे इयत्ता आठवीतील परीक्षेसाठी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे वय १४ वर्षे तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

IPPB GDS Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ३४८ पदांसाठी भरती; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख

Web Title: Maharashtra scholarship exam dates announced 2026 msce pune 5th 8th standard mumbai print news ocd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • Exam
  • Pune

संबंधित बातम्या

Agricultural Damage: अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात! कांदा, द्राक्ष, सोयाबीनचे मोठे नुकसान
1

Agricultural Damage: अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात! कांदा, द्राक्ष, सोयाबीनचे मोठे नुकसान

Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा
2

Pune Crime : पुण्यात मोठी फसवणूक! प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांकडून व्यावसायिकाला ३७ लाखांचा गंडा

HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार
3

HSRP बसवण्यात पुणे आरटीओ आघाडीवर, अंतिम मुदत किती आहे? दंड आकारण्याचा आराखडा तयार

सगळ्या रसवंतीगृहाला कानिफनाथ नावचं का? तुम्हाला ही पडलाय का हा प्रश्न?
4

सगळ्या रसवंतीगृहाला कानिफनाथ नावचं का? तुम्हाला ही पडलाय का हा प्रश्न?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.