SPJIMR ने नवीन श्वेतपत्रिकेमध्ये कुशल आणि चिंतनशील नेतृत्वाची असलेली गरज दर्शवली
मुंबई : भारतीय विद्या भवनच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर)ने आपल्या सेंटर फॉर विस्डम इन लीडरशीप (सीडब्ल्यूआयएल)च्या माध्यमातून नवीन श्वेतपत्रिका ”विस्डम अॅट द हेल्म: रिडिफाइनिंग लीडरशिप फॉर ए कॉम्प्लेक्स वर्ल्ड’ प्रकाशित केली आहे. ऑर्गनायझेशनल अँड लीडरशीप स्टडीजचे प्राध्यापक व सीडब्ल्यूआयएलचे कार्यकारी संचालक सूर्या ताहोरा आणि ऑर्गनायझेशनल अँड लीडरशीप स्टडीजच्या सहाय्यक प्राध्यापिका तन्वी मानकोडी यांनी लिहिलेल्या या श्वेतत्रिकेमध्ये कामगिरी-केंद्रित व्यवस्थापनापासून नैतिकता, चिंतन व दयाळूपणामध्ये सामावलेल्या ज्ञान-आधारित नेतृत्वापर्यंत नेतृत्व विकासामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण श्वेतपत्रिका येथे उपलब्ध आहे: Wisdom at the Helm: Redefining Leadership for a Complex World
आज कामाच्या ठिकाणी असलेल्या बहुआयामी आव्हानांचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिकपणा, सेवक, परिवर्तनकारी आणि जबाबदार नेतृत्व यांसारख्या पारंपारिक नेतृत्व मॉडेल्सच्या वाढत्या कमतरतेचा शोध या श्वेतपत्रिकेमध्ये घेण्यात आला आहे. तंत्रज्ञानामधील अडथळे व शाश्वततेच्या अनिवार्यतेपासून वाढती असमानता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या नैतिक प्रशासनापर्यंत प्रमुख आता अस्थिरता, विरोधाभास आणि नैतिक गुंतागूंतीने व्यापलेल्या विश्वामध्ये काम करत आहेत.
”आजच्या काळात नेतृत्वासाठी दूरदृष्टी आणि चपळतेपेक्षा जास्तची गरज आहे, त्यासाठी कुशल बुद्धीची, म्हणजेच कामगिरीला उद्देशाशी, नावीन्यपूर्णतेला प्रामाणिकपणाशी आणि मानवी मूल्यांना तंत्रज्ञान प्रगतीशी सुसंगत करणाऱ्या क्षमतेची आवश्यकता आहे. नेतृत्व आणि बुद्धी कौशल्याला एकत्र करणे अनुकूल असण्यासोबत धोरणात्मक गरज आहे. कामाचे ठिकाण अधिक गुंतागूंतीचे होत असताना आणि एआय निर्णय घेण्याला नव्या उंचीवर घेऊन जात असताना बुद्धीकौशल्य प्रमुखांना मानव-केंद्रित व उद्देश-संचालित राहण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता देते,” असे प्राध्यापक ताहोरा म्हणाले.
ही श्वेतपत्रिका समकालीन नेतृत्व आराखड्यांमधील महत्त्वपूर्ण तफावतींना ओळखते, तसेच नमूद करते की अनेकजण बहुमूल्य माहिती देतात, पण काही नैतिक जबाबदारी, स्वयं-जागरूकता, चिंतनशील निर्णय आणि दयाळू कृती एकत्र करत काम करतात. सीडब्ल्यूआयएलच्या संशोधनामधून विश्लेषणात्मक क्षमता व चिंतनशील बुद्धीच्या माध्यमातून हवामान बदल, एआय प्रशासन आणि सामाजिक असमानता अशा ‘हानीकारक समस्यां’चे म्हणजेच गुंतागूंतीच्या, परस्परावलंबी आव्हानांचे निराकरण करू शकतील अशा प्रमुखांची गरज दिसून येते.
या श्वेतपत्रिकेमध्ये संस्थात्मक निर्णय घेण्यामध्ये एआयच्या नैतिक एकीकरणावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या श्वेतपत्रिकेमध्ये एआय नैतिक मंडळे, चिंतनशील एआय-सहाय्यक निर्णय यंत्रणा आणि जबाबदार एआय वापरावर देखरेख ठेवण्याप्रती समर्पित भूमिका स्थापित करण्याची शिफारस करण्यात आली आहे, ज्यामधून तंत्रज्ञान मानवी निर्णयक्षमता व सहानूभूती कमी करण्याऐवजी वाढवण्याची खात्री मिळते.
ज्ञान-आधारित नेतृत्व निर्माण करण्यासाठी श्वेतपत्रिका कृतीशील धोरणांची शिफारस करते, जसे:
• नेतृत्व उपक्रमांमध्ये नैतिक निर्णय घेण्याच्या स्थितींचा समावेश करणे.
• पत्रकारिता, प्रशिक्षण व सहकारी शिक्षण अशा चिंतनशील पद्धतींना प्रेरित करणे.
• नैतिक विचारविनिमय आणि चिंतनासाठी एआय-संचालित साधनांचा फायदा घेणे.
• मानवता, अनुकूलता आणि उद्देश-संचालित नेतृत्वाला प्रेरित करणे.
• ज्ञान-केंद्रित मूल्यांवर आधारित संस्थात्मक संस्कृतींना चालना देणे.
लेखकांच्या मते, अल्पकालीन कामगिरी आणि दीर्घकालीन सामाजिक व संस्थात्मक शाश्वतता यांच्यात समन्वय साधण्यासाठी ज्ञान-आधारित नेतृत्व आवश्यक आहे. एसपीजेआयएमआर उत्तम नाविन्यतेच्या संकल्पनेला पाठिंबा देत असताना सीडब्ल्यूआयएलचे कार्य वाढत्या अनेपक्षित विश्वामध्ये सखोलपणे विचार करू शकणाऱ्या, नैतिकतेने वागू शकणाऱ्या आणि सहानुभूतीसह नेतृत्व करू शकणाऱ्या प्रमुखांना घडवण्याप्रती संस्थेच्या मिशनला अधिक दृढ करते.






