Eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होणार आहेत.
जात प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे दस्ताऐवज आहे. ज्याआधारे शासनाच्या स्कोलरशीप आणि फ्रीशीपसाठी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो. शासनाने कुंणबी नोद असलेल्या मराठा समाजाच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठा समाजातील विद्यार्थी अर्ज करत आहेत मात्र त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत. ज्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घोषणा महत्वाची ठरत आहे.
जातीचे प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखीसंबंधी पुरावा- पॅन कार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं
पत्त्यासाठीचा पुरावा :पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स,रेशन कार्ड, पाणी बील, वीज बील इत्यादी
मनोज जरांगे पाटीलांचे आमरण उपोषण
मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. या मागणीमधील विद्यार्थ्यांना कुणबी जातप्रमाणपत्रे देण्याची मागणी होती. त्यासंबंधी सरकारने निर्णय घेतला आहे. जरांगे पाटील यांनी सगे सोयऱ्यांच्याबाबत 7 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचीही हाक त्यांनी दिली आहे. आज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस त्यांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. शनिवारी २० जुलैपासून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. याआधी १३ जुलैपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणांच्या मागण्यांसबंधी मूदत दिली होती.