Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBBS Intern Stipend Hike: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणार? अभाविप अन् पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक

MBBS Intern Stipend Hike: महाराष्ट्रातील एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन १८ हजारांवरून ३० हजार रुपये करण्याच्या मागणीसाठी अभाविप व पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली असून, यावर दिवाळीनंतर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 05, 2026 | 09:52 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • एम.बी. बी. एस. इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीसाठी अभाविप व पालिका प्रशासनाची बैठक
  • पालिका प्रशासनासाेबत संयुक्त बैठक
  • विद्यावेतन ₹१८ हजारांवरून ₹३० हजार करण्याची मागणी
  • दिवाळीनंतर निर्णय घेण्याचे प्रशासनाचे आश्वासन
नीता परब, मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

MBBS Intern Stipend Hike: महाराष्ट्रातील एम.बी. बी. एस. अभ्यासक्रमाच्या इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीसह विविध प्रश्नांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काही महिन्यांपासून पाठपुरावा करत असून शासकीय व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन दरमहा ₹१८,००० वरून ₹३०,००० करावे, तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यावेतनाच्या अनियमिततेवर नियंत्रण आणून सर्व इंटर्न डॉक्टरांना नियमानुसार विद्यावेतन मिळावे, अशा मागण्या अभाविपने मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. या मागण्यांच्या अनुषंगाने पालिका सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संबंधित महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रतिनिधी तसेच अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

बैठकीमध्ये इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीसह खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यावेतनाच्या अनियमिततेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यावेतनवाढीच्या मागणीसंदर्भातील आर्थिक व कायदेशीर बाबींची तपासणी करण्यासाठी प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल आणि दिवाळीनंतर यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले, असे अभाविपकडून सांगण्यात आले.

खासगी महाविद्यालयांमधील अनियमिततेवर नियंत्रण आणण्याबाबत ठाेस पावले उचलावी

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम टप्प्यात एम.बी. बी. एस. इंटर्न डॉक्टरांना प्रत्यक्ष रुग्णसेवा, आपत्कालीन सेवा आणि विविध वैद्यकीय प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागते. रुग्णालयांमधील त्यांच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदारी लक्षात घेता त्यांना मिळणारे सध्याचे ₹ १८ हजार विद्यावेतन अपुरे आहे.

तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इंटर्न डॉक्टरांना विद्यावेतन वेळेवर न मिळणे, विद्यावेतनात अनियमितता असणे अशा तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे विद्यावेतनवाढीसोबतच खासगी महाविद्यालयांमधील या अनियमिततेवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी अभाविप कडून यावेळी करण्यात आली.

Central Railway Apprentice : मध्य रेल्वेत बंपर भरती; कोणतीही परीक्षा नाही! १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

मागण्या पूर्ण होईपर्यंत अभाविपचा पाठपुरावा सुरूच राहणार

यावेळी अभाविप मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “एमबीबीएस इंटर्न डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णसेवेची मोठी जबाबदारी पार पाडतात. असे असतानाही त्यांच्या कामाच्या तुलनेत त्यांना मिळणारे विद्यावेतन अपुरे आहे. अठरा हजारावरून ₹३० हजार विद्यावेतनवाढ ही केवळ आर्थिक मागणी नसून इंटर्न डॉक्टरांच्या कामाला आणि जबाबदारीला योग्य न्याय देण्याची मागणी आहे.

या प्रश्नावर प्रशासनासोबत प्रत्यक्ष बैठक व्हावी आणि संबंधित विभागांपर्यंत विद्यार्थ्यांची बाजू पोहोचावी यासाठी अभाविपने सातत्याने पाठपुरावा केला. बैठकीत हा त्या पाठपुराव्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, केवळ आश्वासन देऊन हा प्रश्न सुटणार नाही. दिवाळीनंतर विद्यावेतनवाढीबाबत ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. मागण्या पूर्ण होईपर्यंत अभाविपचा पाठपुरावा सुरूच राहील.”

Sainik School Admission 2027: सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू! ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन किती रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे?

    Ans: शासकीय व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन दरमहा ₹१८,००० वरून ₹३०,००० करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • Que: विद्यावेतनवाढीच्या मागणीबाबत पालिका प्रशासनाने काय आश्वासन दिले आहे?

    Ans: विद्यावेतनवाढीच्या मागणीसंदर्भातील आर्थिक व कायदेशीर बाबींची तपासणी करून दिवाळीनंतर यावर ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महानगरपालिका प्रशासनाने दिले आहे.

  • Que: खासगी वैद्यकीय महाविद्यालयांबाबत अभाविपने कोणती मुख्य मागणी केली आहे?

    Ans: खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यावेतनात होणाऱ्या अनियमिततेवर आणि वेळेवर विद्यावेतन न मिळण्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Mbbs intern stipend hike doctors demand abvp bmc meeting sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Diwali
  • education
  • MBBS

संबंधित बातम्या

Vasubaras 2026: गोमातेच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटावर…! वसुबारसनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
1

Vasubaras 2026: गोमातेच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटावर…! वसुबारसनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

Vasubaras 2026: दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून का होते? गाय आणि वासराची पूजा करण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या
2

Vasubaras 2026: दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून का होते? गाय आणि वासराची पूजा करण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Best Smartwatch Gifts: यंदाची भाऊबीज करा खास! बहिणीला गिफ्ट करा स्मार्टवॉच; स्टाइल आणि फिटनेसचा मेळ साधणारे ५ पर्याय
3

Best Smartwatch Gifts: यंदाची भाऊबीज करा खास! बहिणीला गिफ्ट करा स्मार्टवॉच; स्टाइल आणि फिटनेसचा मेळ साधणारे ५ पर्याय

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर
4

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.