Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

State Level Innovation Competition: शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांसाठी खूशखबर! एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जाहीर

State Level Innovation Competition 2026: राज्यातील शिक्षक, अधिकारी व अंगणवाडी सेविकांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 04, 2026 | 04:03 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • शिक्षक, अधिकारी अन् अंगणवाडी सेविकांसाठी स्पर्धेचे आयोजन
  • सात गटांत होणार स्पर्धेचे आयोजन
  • जिल्हा व विभागीय स्तरावर पहिला टप्पा
  • राष्ट्रीय शिक्षण धोरण अन् एफएलएन आधारित नवकल्पनांना प्राधान्य
State Level Innovation Competition 2026: राज्यातील शिक्षक, शिक्षण अधिकारी, शिक्षक प्रशिक्षक तसेच अंगणवाडी सेविका यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

या स्पर्धेचे आयोजन यंदा सात गटांत करण्यात येणार आहे. यामध्ये पूर्वप्राथमिक गटातील अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका, इयत्ता पहिली ते दुसरीचे शिक्षक, तिसरी ते पाचवीचे शिक्षक व मुख्याध्यापक, सहावी ते आठवीचे शिक्षक व मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, विषय सहायक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अध्यापकाचार्य आणि पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हा व विभागीय स्तरावर पहिला टप्पा

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या पाच गटांसाठी जिल्हास्तरावर, तर सहाव्या आणि सातव्या गटांसाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या विभागीय स्तरावर स्पर्धा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, बदललेला अभ्यासक्रम, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन), निपुण महाराष्ट्र आणि अध्ययन निष्पत्ती या विषयांशी संबंधित नवोपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Central Railway Apprentice: मध्य रेल्वेत बंपर भरती; कोणतीही परीक्षा नाही! १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी

नवोपक्रम अहवाल सादर करावा लागणार

स्पर्धेत जास्तीत जास्त शिक्षक व अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांना नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक आणि माहितीपत्रकानुसार ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यावर निर्धारित मुदतीत नवोपक्रम अहवाल सादर करावा लागणार आहे. मराठीसह सर्व माध्यमांतील शिक्षकांना स्पर्धेत सहभागी होता येणार असून, इतर माध्यमांतील स्पर्धकांना अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेत सादर करता येणार आहे.

SSB HC Ministerial Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CBT परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला होणार टाइपिंग टेस्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन कोण करत आहे?

    Ans: ही स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (SCERT) आयोजित करण्यात आली आहे.

  • Que: ही स्पर्धा किती गटांमध्ये घेतली जाणार आहे?

    Ans: यंदाची ही स्पर्धा एकूण सात गटांमध्ये घेतली जाणार आहे.

  • Que: या स्पर्धेत कोण सहभाग घेऊ शकते?

    Ans: यामध्ये पूर्वप्राथमिक गटातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, विविध इयत्तांचे शिक्षक, मुख्याध्यापक, विषय सहायक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पर्यवेक्षकीय अधिकारी सहभाग घेऊ शकतात.

Web Title: Scert state level innovation competition 2026 teachers anganwadi sevika sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • education
  • Marathi News
  • navarashta news

संबंधित बातम्या

SSB HC Ministerial Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CBT परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला होणार टाइपिंग टेस्ट
1

SSB HC Ministerial Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CBT परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ तारखेला होणार टाइपिंग टेस्ट

Nagpur News : जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश
2

Nagpur News : जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश

UK Graduate Visa: परदेशात शिकणाऱ्या भारतीयांचे टेन्शन संपले! ब्रिटिश सरकारने ग्रॅज्युएट व्हिसाबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा
3

UK Graduate Visa: परदेशात शिकणाऱ्या भारतीयांचे टेन्शन संपले! ब्रिटिश सरकारने ग्रॅज्युएट व्हिसाबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल
4

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.