फोटो सौजन्य- सोशल मीडिया
या भरती प्रक्रियेत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या विविध क्लस्टरमधील वर्कशॉप्स व युनिट्समध्ये फिटर, वेल्डर, कारपेेंटर, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, पेंटर, स्टेनो अशा विविध ट्रेडसाठी प्रशिक्षणार्थी निवडले जाणार आहेत. अर्जासाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करता, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा (किंवा समकक्षी) उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) किंवा नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग / स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT/SCVT) चे तात्पुरते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
या पदांसाठी वयोमर्यादा ३ नोव्हेंबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण असावी आणि कमाल वयोमर्यादा २४ वर्षांपेक्षा जास्त नसावी, म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०३/११/२००२ ते ०३/११/२०११ या कालावधीतील असावा. नियमानुसार एससी, एसटी उमेदवारांना ५ वर्षे, ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे आणि अपंग व माजी सैनिकांसाठी उच्च वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल. उमेदवारांची निवड कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय केली जाणार असून, १० वी मधील गुण (किमान ५०% गुण) आणि आयटीआय मधील ट्रेडच्या गुणांची साधी सरासरी काढून गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
या भरतीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये इतके असून, एससी, एसटी, अपंग आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. इच्छुक उमेदवारांनी RRC च्या अधिकृत [www.rrccr.com](https://www.rrccr.com) या संकेतस्थळावर जाऊन केवळ ऑनलाइन माध्यमातून अर्ज सादर करावा. मुदतीनंतर आलेले अर्ज किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Ans: या भरती मोहिमेद्वारे एकूण २,८६१ अॅप्रेंटिस पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
Ans: इच्छुक उमेदवारांना २ डिसेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
Ans: उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI (NTC/SCVT प्रमाणपत्र) पास असणे आवश्यक आहे.






