Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रशासकीय पदांची मेगाभरती! रिक्त जागांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मागविले ‘संमती पत्र’

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत उपनगरीय रुग्णालयांमध्ये वरिष्ठ पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू. मुख्य वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक आदी पदांसाठी पात्र अधिकाऱ्यांकडून ‘संमती पत्र’ मागविण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 28, 2026 | 06:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या वरिष्ठ प्रशासकीय पदांच्या भरतीसाठी पालिकेने मेगाभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि उप वैद्यकीय अधीक्षक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यासाठी पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तातडीने ‘संमती पत्र’ मागविण्यात आले आहे. या निर्णयामुळे रुग्णालयांमधील प्रशासकीय गोंधळ कमी होऊन रुग्णसेवा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“माघार घ्या, नाहीतर सरकारी रोष सहन करा!” इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना धमकी

गेल्या दशकभरापासून अनेक उपनगरीय रुग्णालयांमध्ये ही वरिष्ठ पदे रिक्त असल्याने सध्या अनेक ठिकाणी अतिरिक्त कार्यभार देऊन कामकाज चालवले जात आहे. काही रुग्णालयांमध्ये सेवाज्येष्ठतेकडे दुर्लक्ष करून कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, पारदर्शकता राखण्यासाठी आणि योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार पात्र अधिकाऱ्यांकडून लेखी संमती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या भरती प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांकडे संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि प्रशासकीय अनुभव असणे बंधनकारक आहे. सर्व रुग्णालय प्रमुखांना त्यांच्या रुग्णालयातील पात्र अधिकाऱ्यांची संमती पत्रे आज, ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत भाभा रुग्णालय येथील मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही जबाबदारी स्वीकारायची नाही, त्यांच्याकडूनही लेखी नकारपत्र घेण्यात येणार आहे, जेणेकरून पुढील सेवाज्येष्ठ अधिकाऱ्याचा विचार करता येईल. या प्रक्रियेचा एकत्रित अहवाल त्याच दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय जलदगतीने पार पाडली जात आहे.

Nagpur News : पीक काढणीच्या तोंडावर अवकाळी; बळीराजा हवालदिल

दरम्यान, या संमती पत्रासाठी अत्यंत कमी कालावधी देण्यात आल्याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. २७ मार्च रोजी सूचना जारी करण्यात आल्या असताना शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे प्रत्यक्षात अधिकाऱ्यांना अत्यंत मर्यादित वेळ मिळाला आहे. त्यामुळे केवळ अर्धा दिवस आणि पुढील सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आल्याने काही अधिकाऱ्यांकडून तक्रारी समोर येत आहेत. तथापि, या उपक्रमामुळे उपनगरीय रुग्णालयांमधील दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रशासकीय प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून, रुग्णसेवेच्या गुणवत्तेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

Web Title: Mega recruitment for administrative positions in suburban hospitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment Process

संबंधित बातम्या

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी
1

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
2

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.