फोटो सौजन्य - Social Media
काल महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने HSC निकाल जाहीर केला. महाराष्ट्राचा एकूण निकाल 91.88% लागला आणि कोकण विभागाने यात बाजी मारली आहे. मुळात, आज आपल्या शेजारील राज्यात म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये निकालाची लगभग सुरु आहे. मध्य प्रदेश राज्यातील HSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे आज त्यान्ना निकाल पाहता तसेच डाउनलोड करता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मध्य प्रदेश शिक्षण बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट: [mpresults.nic.in](http://mpresults.nic.in) किंवा [mpbse.nic.in](http://mpbse.nic.in) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. पण याने विद्यार्थ्यंना गोंधळात जाऊ नये कारण ही मार्कशीट प्रोव्हिजनल स्वरूपात पुरवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची मूळ मार्कशीट शाळेतून मिळणार आहे.
मूळ मार्कशीट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यंना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही मार्कशीट ऑफलाईन स्वरूपात असल्याने तसेच याची फिजिकल कॉपी असल्याने त्या विद्यार्थ्या संबंधित शाळेतून मिळवता येणार आहे. ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांने त्याचा हजेरी क्रमांक तसेच ओळखपत्र सोबत ठेवावे. परंतु, शाळा कधी ते पुरवणार? यासंबंधित निश्चित तारीख ठरवण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणकांच्या सतत संपर्कात राहावे आणि मूळ मार्कशीटबाबत चौकशी करावी. मार्कशीटनव्यतिरिक्त ट्रान्सफर सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट आदी देखील शाळेतून दिले जातात.
मार्कशीट हातात येताच विद्यार्थ्यांनी काही बाबी तपासून घ्याव्यात यामध्ये नाव, हजेरी क्रमांक तसेच विषय निहाय गुण तपासाव्यात. चूक आढळल्यास ताबडतोब शिक्षक किंवा प्राचार्यांकडे धाव घ्यावी. डिजिलॉकर ([www.digilocker.gov.in](http://www.digilocker.gov.in)) वर लॉगिन करून डिजिटल साईन केलेली मूळ मार्कशीट डाउनलोड करता येईल. ही डिजिटल कॉपी देखील वैध मानली जाते. अधिक माहितीसाठी MPBSE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
एकंदरीत, MP बोर्डाने HSC गुणपत्रिका जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. विदयार्थ्यांनी त्यांचा निकाल http://mpbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तेथे तपासावा. परंतु, ऑनलाईन दिसणारा हा निकाल पुढील औपचारिक कामांसाठी वैध नाही. वैध निकाल म्हणजेच मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्याला संबंधित शाळेतून प्राप्त करता येणार आहे. अधिक माहिती शिक्षण बोर्डाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.