फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मार्फत वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 107 जागा उपलब्ध असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. संबंधित अधिसूचना 2 मे 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 15 मे 2025 आहे. या भरतीअंतर्गत विविध शाखांमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक म्हणून पदे भरली जाणार आहेत. Biology विभागात 27 जागा, Chemistry मध्ये 13 जागा, Physics मध्ये 24 जागा, Ballistics साठी 6 जागा, Cyber Forensic साठी 26 जागा, तसेच Photo साठी 2, Lie Detection साठी 4, Documents साठी 3 आणि HRD/QC विभागासाठी 2 जागा उपलब्ध आहेत.
या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) आवश्यक आहे, तसेच दोन वर्षांचा अनुभवही अनिवार्य आहे. फक्त Sr. Scientific Assistant (Photo) पदासाठी संबंधित विषयातील पदवी (Degree) व दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे इतकी असावी, तसेच सरकारी नियमांनुसार मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट मिळणार आहे.
दिल्ली FSL भरती 2025 साठी निवड प्रक्रिया मुख्यतः मुलाखतीवर आधारित आहे. उमेदवारांची प्रथम मुलाखत घेण्यात येईल, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि शेवटी वैद्यकीय तपासणी केली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे भरून, ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो खालील पत्त्यावर पाठवावा लागेल – Principal Director, Forensic Science Laboratory, Sector-14, Rohini, New Delhi 110085.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि आपली पात्रता तपासावी. त्यानंतर fsl.delhi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. विज्ञान व फॉरेन्सिक क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज सादर करण्यासाठी उशीर न करता दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.