Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख लवकरच जाहीर होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) संदर्भात मोठी बातमी येत आहे. महाराष्ट्रात २५ ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलन करण्यात येत होतं. मात्र या आंदोलनाला शरद पवारांनी पाठिंबा दर्शविला असून या परिक्षेची लवकरच नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2024 | 12:55 PM
MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख लवकरच जाहीर होणार

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख लवकरच जाहीर होणार

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रात २५ ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या उमेदवारांची राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यास आपण (शरद पवार) आंदोलनात सहभागी होऊ, असा इशाराही त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणारे अनेक उमेदवार पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी रात्रीपासून आंदोलन करत आहेत. वास्तविक, एमपीएस पूर्व परीक्षेची तारीख बँकिंग परीक्षेशी टक्कर देत आहे. याचदरम्यान आता MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रवादी-सपा नेते रोहित पवारही आंदोलनात सहभागी झाले असून ते आंदोलक उमेदवारांसोबत बसले होते. कृषी विभागातील २५८ पदांसाठीची निवडही एमपीएससी परीक्षेवर आधारित असावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबद्दल पोस्ट केली.

शरद पवार म्हणाले, “एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. उद्यापर्यंत सरकारने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास, ” मी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले असून लवकरच एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारख्या जाहीर होणार आहेत.

एमपीएससीच्या एका उमेदवाराने सांगितले की त्याला कृषी विभागातील 258 पदे एमपीएससीच्या कक्षेत आणायची आहेत. तर “25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेची तारीख बँकिंग परीक्षेला ओव्हरलॅप करत आहे. अशा परिस्थितीत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, कारण अनेक विद्यार्थ्यांनी दोन्हीसाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. कारण या दोन्ही परीक्षेला बसणे त्यांच्यासाठी अवघड आहे.” एमपीएससीची पूर्वपरीक्षा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. एकाच दिवशी बँकिंग परीक्षा असल्याने या परीक्षेची स्वतंत्र तारीख देण्याची मागणी करत या परीक्षेची तयारी करणारे उमेदवार मंगळवारी रात्रीपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारख्या जाहीर होणार आहेत.

Web Title: Mpsc exam postponed new date will be announced soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 12:55 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू
1

Pune News: ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
2

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
3

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
4

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.