
Maharashtra MLC Election Voting 2026, Pune Graduate Constituency Election
आज शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. राज्यताली एकूण पाच मतदारसंघांमध्ये १८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी १० लाख ६८ हजार ७२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा-जाधव-देशमुख यांच्या विरुद्ध भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात लढत होत आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कौस्तुभ गावडे आणि राष्ट्रीय काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
– आधार कार्ड
– वाहन परवाना
– पॅन कार्ड
– भारतीय पासपोर्ट
– राज्य किंवा केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खासगी औद्योगिक संस्थांनी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले सेवा ओळखपत्र
– खासदार, आमदार आणि विधान परिषद सदस्यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे
– शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील मतदारांसाठी शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र
Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी एकूण २३२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. याठिकाणी एकूण १ लाख ५ हजार ८४ मतदार मतदान करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठवाड्यातील ३,२६,७०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी आठ जिल्ह्यांमध्ये ८४२ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी ८१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या मतदारसंघात ३५ हजार ८१० शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Ans: आज, शुक्रवारी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे.
Ans: या सर्व ५ मतदारसंघांची मतमोजणी सोमवारी, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण होऊन निकाल घोषित केला जाईल.
Ans: पुणे पदवीधरमध्ये हर्षदा जाधव-देशमुख (राष्ट्रवादी शप) विरुद्ध स्मिता जाधव (भाजप) यांच्यात लढत आहे