
Pune District Prepares 7 Lakh 23 Thousand Farmer IDs Under Seva Sankalp Abhiyan
राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी, शासकीय योजनांचा लाभ, डिजिटल कृषी सेवा आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा यावर विशेष भर देण्यात आला.
जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे सुमारे ४.५९ लाख शेतकरी पात्र आहेत. या योजनेच्या माध्यमातून २०१९ पासून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ९०८ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून कृषीविषयक माहिती, सेवा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणाऱ्या ‘महाविस्तार’ ॲपलाही प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार ८६८ शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केले आहे.
शेती आणि शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या महिलांना स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीही मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत जिल्ह्यातून २ लाख ४२ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण १ हजार १८४ दिवे प्रज्वलित करण्यात आले.
फार्मर आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख निश्चित करणे, विविध योजनांच्या लाभांचे वितरण सुलभ करणे, प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे आणि डिजिटल कृषी सेवांचा विस्तार करणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे होती. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांशी जोडण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Ans: पुणे जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण ७ लाख २३ हजार ४५३ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत.
Ans: फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी पूर्ण होऊन त्यांना सरकारी योजनांच्या अनुदानासाठी वारंवार ७/१२ आणि इतर कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.