Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Division Graduate Teachers MLC Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ला बालेवाडीत मतमोजणी

MLC Election : पदवीधर मतदारसंघासाठी ७५ उमेदवारांनी ८७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीनंतर ७० उमेदवारांचे ८१ अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी २३ उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिमतः ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 22, 2026 | 11:19 AM
Pune, MLC Election, Pune Graduate Constituency, Pune Teachers Constituency

Pune, MLC Election, Pune Graduate Constituency, Pune Teachers Constituency

Follow Us
Follow Us:
  • पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
  • २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ५ जिल्ह्यांत मतदान
  • २७ ऑक्टोबरला बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे होणार मतमोजणी
Graduate And Teachers Constituency MLC Elections: विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २१) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता शुक्रवारी (दि. २३) होणाऱ्या मतदानातून मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही मतदारसंघांतील ७७ उमेदवारांचे भवितव्य ४ लाख ५० हजार मतदार ठरविणार असून, निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, सोमवारी (दि. २७) पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे मतमोजणी होणार आहे.

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत दोन्ही मतदारसंघांचे कार्यक्षेत्र आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Ashutosh Ranka- Saurav Das Bail: CJP नेते आशुतोष रांका अन् सौरव दास यांना अखेर जामीन मंजूर

१,०५१ मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण

पदवीधर मतदारसंघासाठी ३ लाख ८८ हजार मतदार असून, त्यांच्यासाठी ७४१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शिक्षक मतदारसंघातील ६२ हजार मतदारांसाठी ३१० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारे दोन्ही मतदारसंघांत मिळून सुमारे साडेचार लाख मतदार १,०५१ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पदवीधरमध्ये ४७, शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार

पदवीधर मतदारसंघासाठी ७५ उमेदवारांनी ८७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीनंतर ७० उमेदवारांचे ८१ अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी २३ उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिमतः ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले.

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर

शिक्षक मतदारसंघासाठी ४९ उमेदवारांनी ६७ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननीनंतर ४८ उमेदवारांचे ६५ अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर ३० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांतील ७७ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला मतदार करणार आहेत.

मतदारांना मतदानाचे आवाहन

मतदान करताना मतपत्रिकेवरील सूचनांचे पालन करावे आणि आपले मत वैध राहील, याची काळजी घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. प्रचाराच्या तोफा थंडावल्याने आता प्रत्यक्ष मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाच जिल्ह्यांतील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार आणि कोण बाजी मारणार, याचे उत्तर २७ ऑक्टोबरच्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान कधी होणार आहे?

    Ans: शुक्रवारी, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत पाचही जिल्ह्यांत मतदान पार पडेल.

  • Que: या निवडणुकीची मतमोजणी कधी आणि कुठे होणार आहे?

    Ans: सोमवारी, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे मतमोजणी होणार आहे.

Web Title: Pune division graduate teachers mlc election campaigning ends voting on october 23 as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • MLC Election
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Farmer ID Seva Sankalp Abhiyan: पुणे जिल्ह्यात ७.२३ लाख फार्मर आयडी तयार; पीएम किसान योजनेतून १,९०८ कोटींचे वितरण
1

Pune Farmer ID Seva Sankalp Abhiyan: पुणे जिल्ह्यात ७.२३ लाख फार्मर आयडी तयार; पीएम किसान योजनेतून १,९०८ कोटींचे वितरण

Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारूची दुकाने किती दिवस बंद राहणार? आज ४ वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी
2

Dry Day Maharashtra: मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! दारूची दुकाने किती दिवस बंद राहणार? आज ४ वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी

Devendra Fadnavis : दहा हजार मते बाद, तर पदवी कोणी दिली? सांगलीत फडणवीसांचा शिक्षक-पदवीधरांना टोला
3

Devendra Fadnavis : दहा हजार मते बाद, तर पदवी कोणी दिली? सांगलीत फडणवीसांचा शिक्षक-पदवीधरांना टोला

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह
4

Pune MLC Election : सोलापुरात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी! रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.