Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Paper Leak Case: मोठी बातमी! ज्यांनी परीक्षा न देता मिळवले थेट घवघवीत गुण, ते ‘टॉपर’ आता थेट पोलीस कोठडीत!

MPSC Paper Leak Case: MPSC औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुणवत्ता यादीत तिसरे व चौथे स्थान पटकावणारे दोन टॉपर विद्यार्थी आणि दोन मध्यस्तांना अटक करण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 28, 2026 | 04:57 PM
mpsc paper leak case

mpsc paper leak case

Follow Us
Follow Us:

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका मिळवून अंतरिम गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक पटकावलेल्या दोन टॉपर उमेदवारांसह दोन मध्यस्थांना अटक करण्यात आली आहे. या नव्या अटकेमुळे या घोटाळ्यातील एकूण आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.

तपासात उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक असून, अटक करण्यात आलेला आरोपी साजिद संदे हा १५२.५० गुण मिळवून तिसऱ्या स्थानी होता, तर विजय किंगर याने १५६ गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला होता. याआधी अटक केलेली ऋतुजा पाटील हिने देखील १५५ गुण मिळवून सातवा क्रमांक पटकावला होता.

Study in Germany 2026: जर्मनीमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहताय? ट्यूशन फीऐवजी ‘या’ खर्जाचे बजेट चुकले तर होईल मोठी अडचण

हे अव्वल गुण मिळवणारे संशयित उमेदवार आता गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत. गुन्हे शाखेने साजिद संदे याला सांगोला येथून, तर विजय किंगर याला बुलढाणा येथून ताब्यात घेतले आहे. तसेच मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणारे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर संदीप खलाटे आणि भारतीय नौदलात सिव्हिल टेक्निशियन असलेला भैरवनाथ कदम यांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

मध्यस्थांमार्फत पेपर फोडल्याचे समोर आले

यापूर्वी MPSC चा अवर सचिव अभिजीत लेंडवे याने मध्यस्थांमार्फत हा पेपर फोडल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्यासह विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे, प्रवीण पाटील आणि इतर मध्यस्थांना याआधीच अटक करण्यात आली असून सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?

नेहमी सामान्य कामगिरी करणारे विद्यार्थी संशयाच्या भोवऱ्यात

२२ जुलै रोजी जाहीर झालेल्या ४८८ जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीत बहुतांश विद्यार्थ्यांना १२१ पर्यंतच गुण मिळाले होते. मात्र, त्यापेक्षा अधिक गुण मिळवून अव्वल आलेले आणि इतर परीक्षांमध्ये सामान्य कामगिरी करणारे विद्यार्थी संशयाच्या घेऱ्यात आले, ज्यावर आता या कारवाईमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. MPSC तर्फे २२ मार्च २०२६ रोजी ६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल असून आणखी काही उमेदवारांचा सहभाग समोर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Mpsc paper leak drug inspector exam toppers arrested mumbai police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Breaking News
  • MPSC Exam
  • MPSC Paper Leak

संबंधित बातम्या

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?
1

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
2

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
3

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
4

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.