Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Job Ad Controversy: नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीवरून भाषिक वाद! २५ लाखांच्या पॅकेजसाठी मराठी उमेदवारांना ‘नो एंट्री?

Mumbai Job Ad Controversy: नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवर मुंबईतील एका उच्चपदस्थ नोकरीसाठी 'फक्त गुजराती-मारवाडी' उमेदवारांना प्राधान्य देणारी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामुळे मराठी तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 10, 2026 | 02:39 PM
job

job

Follow Us
Follow Us:

Mumbai Job Ad Controversy : सध्या सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. यामध्ये नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमध्ये मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप केला जातोय. या जाहिरातीमध्ये फक्त गुजराती-मारवाडी अर्ज करू शकतात, असा उल्लेख केला असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील या नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भरती एजन्सीकडून स्पष्टीकरण

या वादग्रस्त जाहिरातीवर अहमदाबादस्थित भरती एजन्सीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये कंपनीचे म्हणणं आहे की, आमची कंपनी ही रिक्रुटमेंट कंपनी आहे. प्लेसमेंट देण्याच काम आमच्या कंपनीकडून करण्यात येत असून विविध कंपन्यांच्या विविध पदांवर त्यांच्या गरजेनुसार पद भरायची असतात.

Exam Superstitions: उशीखाली पुस्तक, तर बुटात नाणे! परीक्षेच्या ताणातून सुटण्यासाठी जगात कुठे काय करतात? वाचा रंजक टोटके!

येथे काम करणारे कर्मचारीही वेगवेगळ्या भागांतून आले असून विविध भाषा बोलणारे आहेत. त्यामुळे या जाहीरातींचा वेगळा अर्थ घेऊ नये, कंपन्यांच्या गरजेनुसार त्या पादांसाठी भाषेची गरज पाहून तशा प्रकारची जाहिरात दिली आहे.

भाषिक वाद पेटण्याची शक्यता

EGM आणि अकाउंट्स फायनान्स पदासाठी भरती प्रक्रिया राबण्यात येत आहे. यासाठीची जाहिरात अहमदाबादस्थित भरती एजन्सीकडून नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवर पब्लिश करण्यात आली आहे. या पोस्टसाठी 20 ते 25 लाखांचे आकर्षक वार्षिक वेतन दिले जाणार आहे. ही नोकरी  मुंबईत असून या नोकरीसाठी गुजराती – मारवाडी भाषिक अर्ज करू शकतात. असा उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे हा वाद पेटला आहे.

Khan Sir biography: कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या खान सरांची कौटुंबिक पार्श्वभूमी पहा एका क्लिकवर..

दरम्यान, सोशल मीडियावर या जाहिरातीबद्दल संतापाची लाट उसळली असून मुंबईकर मराठी तरूणांनी जायच कुठे? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. रोजगार प्रक्रियेत भाषिक भेदभावाचा आरोप करण्यात आला आहे. जाहिरातीमुळे पुन्हा भाषिक वाद उसळण्याची शक्यता आहे. तसेच ही जाहिरात ज्या कंपनीची आहे, त्या संबंधित कंपनी आणि भरती एजन्सीवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Mumbai job ad controversy linkedin naukri marathi discrimination

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • controversy
  • Gujrati
  • High salary Job
  • Maratha Samaj

संबंधित बातम्या

Apple New CEO : अ‍ॅपलमध्ये महाभूकंप! टिम कुक मुख्यपदावरून बाजूला, New CEO चा रेकॉर्डब्रेक पगार वाचून थक्क व्हाल
1

Apple New CEO : अ‍ॅपलमध्ये महाभूकंप! टिम कुक मुख्यपदावरून बाजूला, New CEO चा रेकॉर्डब्रेक पगार वाचून थक्क व्हाल

पेपरफुटीमुळे MPSC ला दणका! औषध निरीक्षक परीक्षा रद्द, तर कृषी सेवेच्या गुणदानावर विद्यार्थ्यांचे गंभीर आक्षेप
2

पेपरफुटीमुळे MPSC ला दणका! औषध निरीक्षक परीक्षा रद्द, तर कृषी सेवेच्या गुणदानावर विद्यार्थ्यांचे गंभीर आक्षेप

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
3

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Old Monk पिणाऱ्यांनो इथे लक्ष द्या… आता Rum विकली जाणार नाही? जाणून घ्या नेमका काय आहे वाद?
4

Old Monk पिणाऱ्यांनो इथे लक्ष द्या… आता Rum विकली जाणार नाही? जाणून घ्या नेमका काय आहे वाद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.