फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Khan Sir Family: बिहारमधील प्रसिध्द कोचिंग शिक्षक ‘खान सर’ (Khan Sir) हे पुन्हा चर्चेत आले आहेत. पाटणा दिवाणी न्यायालयाने (Patna Civil Court) खान सर यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. न्यायालायाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी करताना त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. पाटणा पोलिसांनी खान सर यांच्याविरोधात आर्म्स ॲक्ट आणि जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, ज्यावर आज सुनावणी झाली. या कायदेशीर वादाच्या दरम्यान लोकांच्या मनात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषत: त्यांच्या कुटुंबियांबद्दल अनेकांना जाणून घ्यायचे आहे की खान सरांचे कुटुंब पूर्वीपासूनच श्रीमंत होते का?
विविध मीडिया रिपोर्टनुसार, खान सर यांचे खरे नाव हे ‘फैसल खान’ आहे. त्यांच्या वडीलांचे नाव बशीर खान असून ते भारतीय लष्करात (Indian Army) अधिकारी म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले होते. त्यांची आई गृहिणी आहे. खान सर यांनी अनेकदा आपल्या संघर्षाच्या दिवसाची आठवण काढत त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागल्याचा उल्लेख केला आहे. त्याचे कुटुंब अत्यंत शिस्तप्रिय वातावणातील होेते. परंतु, ते कोणत्याही मोठ्या व्यवसायिक किंवा अब्जाधीश कुटुंबातून आले ऩाहीत. याच कारणामुळे खान सर आजही त्यांच्या यशाचे श्रेय कठोर परिश्रमाला आणि शिक्षणाला देतात.
खान सर हे देशातील सर्वात लोकप्रिय शिक्षकांपैकी एक मानले जातात. त्यांची पाटणामध्ये मोठी कोचिंग संस्था आहे. तसेच त्यांचे यूट्युब चॅनेलही कोट्यावधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले आहे. त्यांच्या यूट्युब चॅनलचे नाव “Khan GS Research Centre” असे असून सुमारे २.४ कोटी (24 Million) सब्सक्राइबर्स आहेत. त्याच्या उत्पन्नाबाबबत वेगवेगळे आंदाज लावले जातात. काही रिपोर्टनुसार, त्यांची संपत्ती (Net Worth) सुमारे ५ कोटी ते २० कोटी च्या दरम्यान आहे. या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत ऑनलाईन क्लासेस यूट्यूब आणि शैक्षणिक साहित्य आहेत.परंतु त्याच्या संपत्तीचा कधीही अधिकृत आकडा जाहीर झाला नाही.






