Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठात नॅनोतंत्रज्ञानासाठी सुवर्णसंधी; बीएस्सी ऑनर्स व रिसर्चसह अत्याधुनिक अभ्यासक्रम

University of Mumbai मध्ये नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नोलॉजी विषयात बीएस्सी ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च असे पर्याय उपलब्ध असून, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 01, 2026 | 03:28 PM
मुंबई विद्यापीठात नॅनोतंत्रज्ञानासाठी सुवर्णसंधी; बीएस्सी ऑनर्स व रिसर्चसह अत्याधुनिक अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठात नॅनोतंत्रज्ञानासाठी सुवर्णसंधी; बीएस्सी ऑनर्स व रिसर्चसह अत्याधुनिक अभ्यासक्रम

Follow Us
Follow Us:
  • मुंबई विद्यापीठात नॅनो तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक शिक्षणासाठी सुवर्णसंधी
  • संशोधनाधिष्ठित अभ्यासक्रम, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण
  • बीएस्सी ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च (नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी) पर्याय उपलब्ध
नीता परब, मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख शिक्षणाची दिशा देत मुंबई विद्यापीठाच्या नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्सेस अँड नॅनोटेक्नॉलॉजी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक संशोधन सुविधा, अनुभवी मार्गदर्शक आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षणामुळे हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

University of Mumbai एलएलएम सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

या केंद्रामार्फत यावर्षी पारंपरिक २ वर्षांचा एम.एस्सी. (नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी) अभ्यासक्रमांसोबतच काही नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी अधिक शैक्षणिक आणि संशोधनाधारित संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय नॅनोविज्ञान व नॅनोतंत्रज्ञान केंद्राने यंदा बी.एस्सी. ऑनर्स (नॅनोसायन्स अँड नॅनोतंत्रज्ञान), बी.एस्सी. ऑनर्स विथ रिसर्च (नॅनोसायन्स अँड नॅनोतंत्रज्ञान) तसेच पीजी डिप्लोमा (नॅनोसायन्स अँड नॅनोतंत्रज्ञान) हे नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या सर्व अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थी पात्र असतील, ज्यामुळे विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना नॅनोविज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, एम.एस्सी. (नॅनोसायन्स अँड नॅनोतंत्रज्ञान) (१ वर्षाचा अभ्यासक्रम) देखील उपलब्ध असून, त्यासाठी बी.ई./बी.टेक (संबंधित शाखा) असलेले विद्यार्थी पात्र ठरतील.

नॅनो स्तरावरील विज्ञानाच्या अभ्यासातून स्मार्ट मटेरियल्स, ऊर्जा साठवण तंत्रज्ञान, सेमिकंडक्टर्स, नॅनोबायोटेक्नॉलॉजी, नॅनोसेन्सर्स आणि नॅनोइलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांत संशोधनाची संधी येथे उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रयोग, प्रकल्प आणि उद्योगसंलग्न प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यावर भर दिला जातो.

नॅनोविज्ञान आणि नॅनोतंत्रज्ञान या उदयोन्मुख क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन या केंद्रातर्फे करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रिया, पात्रता निकष आणि इतर तपशीलांसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच या लिंक वरून फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. (https://docs.google.com/forms/d/1xn4XmXpoyih69V9utMk7uYILSlnEbU2jbkoj4Ep6OlU/viewform?edit_requested=true)

JEE Advanced Registration 2026 Apply Last Date: आयआयटी प्रवेशासाठी अर्ज केला का? उद्या आहे शेवटची संधी!

Web Title: Mumbai university nanotechnology bsc honours research course details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • india
  • Mumbai University

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?
2

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?
3

India Pakistan 1991 Agreement: पाकिस्तानचं शेपूट वाकडचं; घुसखोरीतून भारत-पाक १९९१ कराराचे ‘कलम १०’ चे उल्लंघन?

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा
4

US Tariff on India: भारतावर 100% टॅरिफचं संकट, अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक मंजूर; आता ट्रम्प यांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.